नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या चांगलाच रंगात आला असून राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. तसेच काही कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्नही निर्माण झाले आहेत. त्यातच आता कर्हाल इथून समाजवादी पार्टीचे अध्यक्ष खासदार अखिलेश यादव यांच्याविरोधात लढणारे भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री आणि खासदार सत्यपाल सिंह बघेल यांच्या सुरक्षा व्यवस्थेत केंद्र सरकारनं वाढ केली असून त्यांना झेड सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. (BJP Karhal candidate SP Singh Baghel gets Z category security who is contesting against Akhilesh Yadav)
केंद्रीय विधी आणि न्याय राज्यमंत्री सत्यपाल सिंह बघेल यांना ११ फेब्रुवारी रोजी झेड सुरक्षा प्रदान करण्यात आली. उत्तर प्रदेशात प्रचारादरम्यान मंगळवारी रात्री भाजपचे वरिष्ठ नेते असलेल्या बघेल यांच्या वाहनांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली होती. समाजवादी पार्टीच्या गुंडांनी हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप भाजपनं केला होता. या पार्श्वभूमीवर त्यांची वाय प्लसवरुन झेड मध्ये रुपांतरीत करण्यात आली आहे.
मनिपुरी जिल्ह्यातील रहमतुल्लाहपूर गावात दौरा सुरु असताना हा हल्ला झाला होता. दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचारासाठी ते निघाले असताना त्यांच्या ताफ्यातील वानांवर दगडफेक झाली होती. या हल्ल्यामध्ये संबंधित वाहनाचं मोठ नुकसानं झालं होतं. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली पण तोपर्यंत बघेल हे प्रचारस्थळी पोहोचले होते आणि दगडफेक करणारे लोक पळून गेले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.