बिहारमध्ये भाजपचा 'लालू फॉर्म्युला'; राज्यसभा निवडणुकीत बदलली रणनीती, वाचा इनसाईड स्टोरी

Bihar Politics: बिहारमध्ये विविध जातींच्या संमेलनांचे आयोजन; सर्व समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न
lalu prasad yadav bjp
lalu prasad yadav bjp sakal
Updated on

Bihar Politics: बिहारच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष आता ‘लालू सूत्रा’चा वापर करीत आहे. छोट्या-छोट्या जाती-जमातींवर पक्षाच्या प्रभाव ठेवणे हे ‘लालू सूत्र’ असून विविध समाजातील संमेलनाच्या आयोजनातून याची अंमलबजावणी भाजप करीत आहे.

भाजपने आतापर्यंत नाभिक संमेलन, धानुक, कुंभार, विश्‍वकर्मा आदी जातींच्या संमेलनांचे आयोजन केले आहे. पुढील महिन्यात चंद्रवंशीसह अन्य जातींची संमेलनेही होणार आहेत. बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालू प्रसाद यादव हे नव्वदच्या दशकात स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होते, त्यावेळी अशी जातीनिहाय संमेलने मोठ्या प्रमाणात होत होती.

lalu prasad yadav bjp
Lalu Yadav: खर्गे, पवार, ममतांनंतर आता लालूंचाही नकार! राम मंदिर सोहळ्याला लावणार नाहीत हजेरी

तेव्हा लालू प्रसाद यांच्यावर जातींत तेढ निर्माण करण्याचा आरोप केला होता. आता मात्र समाजातील सर्व वर्गांसाठी आणि जातींना एकत्र आणण्यासाठी संमेलन घेत असल्याचा दावा भाजप करीत आहे.(bihar bjp formula)

अतिमागासवर्गीयांवर लक्ष

भाजपचे लक्ष अति मागासवर्गीयांवर आहे. या जाती आतापर्यंत तीन गटांत विभागल्या गेल्या होत्या. एक गट लालू प्रसाद यांच्या बरोबर होता, दुसरा मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबरोबर तर तिसरा गट डाव्या पक्षांबरोबर आहे.

जातीनिहाय सर्वेक्षणाच्या अहवालानुसार बिहारमध्ये अति मागासवर्गीयांची लोकसंख्या सुमारे ३६ टक्के आहेत. लालू प्रसाद यांना सामाजिक समर्थन कमी झाल्यानंतर त्याचा लाभ नितीश कुमार यांना मिळाला होता. या मोठ्या समाजाला खेचून घेण्याचे आटोकाट प्रयत्न आता भाजप करीत आहेत. त्यांचे प्रयत्न यशस्वी झाल्यास नितीश कुमार यांना फटका बसणार, हे जाहीर आहे.

lalu prasad yadav bjp
Bihar Floor Test: बिहारमध्ये विश्वासदर्शक ठरावापूर्वीच मोठा ट्विस्ट; १० आमदार नॉटरिचेबल, पोलिसांत तक्रार; जाणून घ्या १० महत्वाच्या घडामोडी

सवर्ण जातींची कल साहजिकच भाजपकडे आहे. समाजातील सर्व थरांना पक्षाकडे आकर्षित करून घेण्याची भाजपची रणनीती असून तसे नियोजन आखले आहे. यानुसार हरी सहनी यांना विधान परिषदेतील पक्ष नेतेपदी नियुक्त करण्यात आले. भाजपचे प्रदेश अध्यक्ष सम्राट चौधरी कुशवाहा समाजातील आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदी नंदकिशोर यादव यांची निवड करण्यात आली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी पाटण्याचा दौर केला असून कृष्णवंशी संमेलनात ते सहभागी झाले होते.(bjp politics in bihar)

राज्यसभा निवडणुकीत बदलली रणनीती

राज्यसभा निवडणुकीत भाजपची रणनीती बदलल्याचे दिसून आले. पक्षाने अतिमागास समूहाच्या दोन प्रतिनिधींना राज्यसभेत पाठविले आहे. यातील एक भीमसिंह आहेत. लालू प्रसाद आणि नितीश कुमार यांच्याबरोबर त्यांनी काम केले आहे. नंतर ते भाजपमध्ये आले. ते चंद्रवंशी समाजातील आहेत. दुसऱ्या प्रतिनिधी धर्मशीला गुप्ता या अति मागासवर्गातील आहेत.

lalu prasad yadav bjp
Bihar Politics : नितीशकुमार सरकारचे उद्या भवितव्य ठरणार

त्यांनाही भाजपने राज्यसभेत पाठविले आहे. सामाजिक न्यायाचे समर्थन करणाऱ्या पक्षांनी सवर्ण समाजातील लोकांना राज्यसभेत पाठविण्यास प्राधान्य दिले आहे. संयुक्त जनता दलाने (जेडीयू) ब्राह्मण समाजातील संजय झा यांना राज्यसभेत पाठविले तर लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाने ब्राह्मण समाजातील मनोज झा आणि यादव समाजातील संजय यादव यांची वरिष्ठ सभागृहाच्या सदस्यपदासाठी निवड केली. काँग्रेसने भूमिहार समाजातील अखिलेशसिंह यांना दुसऱ्यांदा संधी दिली आहे.(lalu prasad yadav)

निवडणुकीतील सामना सोपा करण्याचा

समाजात पक्षाचे स्थान निर्माण करण्यासाठी आतापर्यंत भाजप बिहारमध्ये काँग्रेसव्यतिरिक्त पक्षांशी तडजोड करीत होता. पण आता छोट्या-छोट्या जातींवर लक्ष केंद्रित करून त्यांना पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. त्यामुळे अतिमागास वर्गांचा पाठिंबा त्यांना मिळू शकतो. लालू प्रसाद आणि नितीश कुमार यांचे सामाजिक न्यायाचे धोरण स्वीकारून निवडणुकीतील सामना सोपा करण्याचा भाजपचा विचार आहे.(bjp)

lalu prasad yadav bjp
Bihar Politics : "मी मृत्यू पत्करेन, पण…", पलटी मारण्याच्या चर्चेदरम्यान नितीश कुमारांचा जुना व्हिडीओ व्हायरल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.