BJP Ticket : तिकीट नाकारल्याने भाजप नेत्याने उचललं टोकाचं पाऊल; आता...

Deepak Saini
Deepak Saini
Updated on

शामली : उत्तर प्रदेशात स्थानिक स्वराज्य निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. रविवारी भाजपने शामलीसह अनेक जिल्ह्यांतील उमेदवारांची यादी जाहीर केली होती. मात्र या यादीत माजी सदस्य आणि भाजप नेते दीपक सैनी यांचे नाव नव्हते. यामुळे नाराज झालेल्या दीपाक सैनी यांनी टोकाचे पाऊल उचलले.

Deepak Saini
2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजप 350 पेक्षा जास्त जागा जिंकेल; केंद्रीय मंत्र्यांचा दावा

उमेदवारी मिळाली नसल्याने नाराज झालेल्या सैनी यांनी विषारी औषध प्राशन केले. त्यांना गंभीर अवस्थेत मेरठ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. दीपक सैनी हे गेल्या महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. यावेळीही त्यांना आपल्या तिकिटाबाबत खात्री होती आणि ते प्रभाग क्रमांक तीनमधून निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते.

Deepak Saini
Ajit Pawar: अजित पवारांचे दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

उमेदवारांच्या यादीत नाव न आल्याने दीपक सैनी यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ते कमालीचे निराश झाले. संध्याकाळी त्यांनी विष प्राषन केले. काही वेळाने ते बेशुद्ध पडले. प्रकृती बिघडल्यानंतर कुटुंबींयांनी त्यांना शामली येथील रुग्णालयात आणि त्यानंतर मेरठ येथे हलविले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

उमेदवारी दीपक सैनी यांच्या आईने मुलाच्या मृत्यूनंतर एकच टाहो फोडला. तसेच आम्हाला उमेदवारी नको की, सभापतीपद नको, मला माझा मुलगा परत द्या, अस म्हणत त्यांनी हंबरडा फोडला. कांधला येथील मोहल्ला रायजादगन येथील रहिवासी असलेले दीपक सध्या भाजपच्या मागासवर्गीय सेलचे जिल्हाप्रमुख प्रमुख होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.