नुपूर शर्मांनंतर पैगंबर मोहम्मदांबद्दल आणखी एक वादग्रस्त पोस्ट, भाजप नेत्याला अटक

Harshit Srivastava
Harshit Srivastavaesakal
Updated on
Summary

भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मानं पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं.

भाजपच्या (BJP) प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरील प्रतिक्रियांचा सिलसिला थांबण्याचं नाव घेत नाहीय. एकीकडं नुपूरच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर उघडपणे भाषणबाजी केली जात आहे, तर दुसऱ्या बाजूला जोरदार विरोध होत आहे. याप्रकरणी कानपूर पोलीस सतर्क झाले असून खोटी विधानं करणाऱ्यांची ओळख पटवून कारवाई करत आहेत. मंगळवारी पोलिसांनी एका भाजप नेत्याला अटक केलीय. त्यांच्यावर पैगंबर मोहम्मद (Mohammad Paigambar) यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप आहे.

कर्नलगंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षित श्रीवास्तव (Harshit Srivastava) असं आरोपीचं नाव असून तो भाजपच्या युवा मोर्चाचा सदस्य आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आलाय. हर्षितनं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सदस्यही असल्याचं सांगितलं. कानपूरचे पोलीस (Kanpur Police) आयुक्त विजय सिंह मीना यांनी सांगितलं की, 'हर्षितनं पोस्टद्वारे चुकीची टिप्पणी केली होती, त्यामुळं त्याला अटक करण्यात आलीय. सामाजिक सलोखा बिघडू नये म्हणून ही कारवाई केलीय.'

Harshit Srivastava
RSS नं गावोगावी जाऊन गोळा केल्या 'चड्ड्या'; काँग्रेसविरोधात सुरु केली 'ही' मोहीम

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नुपूर शर्मानं पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांच्या समर्थनार्थ दिल्ली भाजपचे मीडिया प्रभारी नवीन कुमार जिंदाल यांनीही ट्विट केलं होतं. हे प्रकरण चिघळल्यानं भाजपनं नुपूरला निलंबित केलं. तर, जिंदाल यांच्यावर 6 वर्षांसाठी पक्षात बंदी घातली. दोन्ही नेत्यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर जोरदार भाषणबाजी सुरूय. अनेक मुस्लिम देशांनीही या वक्तृत्वावर आक्षेप घेतलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.