BJP leader Jyotiraditya Scindia Loyalist Samandar Patel Quits BJP
Bhopal (Madhya Pradesh) भोपाळ- भारतीय जनता पक्षाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांचे विश्वासू समजले जाणारे समंदर पटेल यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ यांच्या उपस्थितीत समंदर पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भोपळमध्ये काँग्रेसच्या ऑफिसमध्ये समंदर पटेल यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.
पक्षाच्या नेत्यांनुसार, पटेल यांनी ८०० वाहनांच्या ताफ्यासह त्यांच्या घरापासून पक्षाच्या कार्लालयापर्यंत रॅली काढली होती. कमलनाथ यांनी यावेळी म्हटलं की, पटेल यांनी काँग्रेसची विचारधारा, नीतीमत्ता या गुणांसह पक्षाचा स्विकार केला आहे. सत्य त्यांना येथे घेऊन आले आहे. पटेल आपल्या भागातील लोकांना खरं बोलतील असा मला विश्वास आहे.
२०१८ मध्ये लोकांच्या विश्वासामुळे काँग्रेस सरकार निर्माण झाले आहे, पण शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वातील भाजप सरकार पैशाच्या जीवावर निर्माण झाले आहे. गेल्या १८ वर्षांपासून भाजप सरकार सत्तेत आहे, पण राज्याची स्थिती सगळ्यांच्या समोर आहे. राज्यात भ्रष्टाचार, घोटाळा यांनाच फक्त स्थान मिळालं आहे, अशी टीका कमलनाथ यांनी केली.
चौहान यांच्या नेतृत्वातील भाजप सरकार केवळ भ्रष्टाचारात पहिल्या क्रमांकावर नाही, तर महिला, शेतकरी आणि तरुणांवर अत्याचार करण्यामध्येही पहिला आहे. पण, आता राज्याच्या जनतेने आपलं मन तयार केलं आहे. निवडणुकीत भाजपचा पराभव होणार आहे, असंही ते म्हणाले.
पटेल यांनी यावेळी म्हटलं की, 'काँग्रेसमध्ये परत येऊन मी खूप आनंदी आहे'. गेल्या काही दिवसात अनेक ज्योतिरादित्य शिंदे समर्थक भाजप सोडून गेले आहेत. काही दिवसांपूर्वी बैजनाथ सिंग यादव यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तसेच राकेश गुप्ता यांनीही भाजपला सोडचिठ्ठी देत आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.