Nitin Gadkari: 'किलोभर मटण घरोघरी पोहोचवले, तरीही निवडणूक हरलो...', गडकरींनी सांगितला तो किस्सा

गडकरी म्हणाले काही देऊन निवडणूक जिंकता नाही येत त्यासाठी विश्वासच मिळवावा लागतो
nitin gadkari
nitin gadkarisakal
Updated on

Election News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी कायचच ओळखले जातात. पुन्हा एकदा स्वत:चाच निवडणुकीचा किस्सा सांगताना त्यांनी प्रत्येक किलो मटण वाटूनही निवडणूक कशी हरली हे सांगितले आहे. मतदार खूप हुशार आहेत, प्रत्येकाचा माल खातात आणि ज्याला मत द्यायचे त्यालाच मत देतात, असेही ते यावेळी म्हणाले आहेत.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. यावेळी त्यांनी एका निवडणुकीचा किस्सा सांगितला आहे. लोक निवडणुकीत पोस्टर लावून, मतदारांना खाऊ घालून विजयी होतात. पण माझा त्यावर विश्वास नाही. गडकरी म्हणाले, मी अनेक निवडणुका लढवल्या आहेत. मी सर्व प्रयत्न केले आहेत. मी एकदा एक प्रयोग केला. प्रत्येकी एक किलो सावजी मटण घरोघरी पोहोचवले. पण आम्ही त्यावेळी निवडणूक हरलो.

nitin gadkari
Nashik: अंजनेरी-ब्रह्मगिरी रोप-वे स्थलांतरणविषयी नाशिकच्या खासदारांना भेटा; संदीप भानोसेंना गडकरींची सूचना

मतदार खूप हुशार आहेत - गडकरी

गडकरी म्हणाले, जनता खूप हुशार आहे. लोक म्हणतात, जे दिले जाते ते खा. ती आपल्या वडिलांची मालमत्ता आहे. पण त्यांना मतं द्यायची असताता त्यांनाच दिली जातात. जेव्हा तुम्ही तुमच्या लोकांमध्ये विश्वास निर्माण करता तेव्हाच त्यांचा तुमच्यावर विश्वास असतो आणि त्यासाठी कोणत्याही पोस्टर बॅनरची गरज नसते. अशा मतदाराला कोणत्याही लोभाची गरज नाही, कारण त्याचा तुमच्यावर विश्वास आहे आणि तो दीर्घकालीन आहे, अल्पकालीन नाही असंही गडकरी पुढे म्हणाले आहेत.

nitin gadkari
Chandni Chowk flyover : चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते 12 ऑगस्टला उद्घाटन

गडकरी म्हणाले, होर्डिंग लावून किंवा मटण पार्टी देऊन कोणतीही निवडणूक जिंकता येत नाही. जनतेमध्ये विश्वास आणि प्रेम निर्माण करा. निवडणुकीच्या वेळी प्रलोभने दाखवण्यापेक्षा लोकांच्या मनात विश्वास आणि प्रेम निर्माण करा, असंही गडकरी पुढे म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.