Lok Sabha Speaker: भाजपकडून लोकसभा अध्यक्षपदाच्या नावावर शिक्कामोर्तब! ओम प्रकाश बिर्लांनी भरला नामांकन अर्ज

Om Birla filed nomination for lok sabha speaker: भाजपचे खासदार ओम प्रकाश बिर्ला यांनी दुसऱ्या कार्यकाळासाठी लोकसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे.
Om Birla
Om Birla

नवी दिल्ली- लोकसभा अध्यक्षपदासाठी आज नामांकन अर्ज दाखल करायचा आहे. बुधवारी यासंदर्भात निवडणूक होईल. त्याआधी भाजपचे खासदार ओम प्रकाश बिर्ला यांनी दुसऱ्या कार्यकाळासाठी लोकसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बिर्ला हेच लोकसभेचे अध्यक्ष असतील असं जवळपास निश्चित मानलं जात आहे.

विरोधकांना उपाध्यक्ष पद दिल्यास अध्यक्षपदासाठी उमेदवार देणार नाही असं इंडिया आघाडीने म्हटलं होतं. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी आज सकाळी यासंदर्भात माहिती दिली होती. पण, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिर्ला यांना पुन्हा संधी दिली गेली असल्याने विरोधक अध्यक्षपदासाठी उमेदवार देणार असल्याची माहिती आहे. के. सुरेश हे काँग्रेसकडून नामांकन अर्ज दाखल करू शकतात.

Om Birla
Parliament Session 2024 : पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदासाठी होणार निवडणूक; ओम बिर्ला यांच्यासमोर के सुरेश मैदानात

लोकसभा अध्यक्षपदासाठी बुधवारी निवडणूक होईल. यामध्ये भाजपकडून अनेक नावे चर्चत होते. शिवाय ओम बिर्ला यांचा पहिला कार्यकाळ पाहता त्यांना पुन्हा संधी दिल्यास विरोधक आक्रमक होण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांना पुन्हा लोकसभा अध्यक्षपदासाठी पुढे करण्याची शक्यता कमी होती. मात्र, भाजपने पुन्हा त्यांना पसंती दिली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Om Birla
Nilesh Lanke: 'आय निलेश लंके, टेक ओथ...'; सुजय विखेंचं आव्हान स्वीकारलं अन् इंग्रजीमधून संसदेत घेतली शपथ

इंडिया आघाडीतून के. सुरेश यांनी उमेदवारी दाखल केल्यास लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार नाही. त्यामुळे बुधवारी लोकसभेमध्ये काय घडामोडी घडतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान, भाजपकडून दक्षिणेतील नेत्या पुरंदेश्वरी यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. पण, बिर्ला यांनी अर्ज दाखल केला असल्याने या चर्चांवर पडदा पडला आहे.

दरम्यान, २४ जून पासून १८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरु झाले आहे. पहिले दोन दिवस खासदारांचा शपथविधी होणार आहे. पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदी आणि कॅबिनेट मंत्र्यांनी संसद सदस्यत्वाची शपथ घेतली. दुसऱ्या दिवशी राज्यात खासदारांनी शपथ घेतली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com