भाजप आमदाराचं मोठं मन; स्वतः कर्जबाजारी होत जनतेला घेऊन दिली जमीन, इतक्या कोटींचं आहे कर्ज

असा एका आमदार आहे जो नागरिकांसाठी स्वतः कर्जबाजारी झाला
bjp leader santosh barkade loan 50 lakh donated one acre land
bjp leader santosh barkade loan 50 lakh donated one acre land
Updated on

जगासह देशभरात राजकीय क्षेत्रात अनेक नेते असे आहेत जे आपापली तिजोरी भरण्याच्या मागे असतात. नागरिकांच्या समस्या पुढे करुन अनेक नेते कोट्यांवधी निधी मिळवताना दिसतात पण प्रत्यक्षात काम मात्र झिरो असते. निधींच्या पैशावर अनेक नेते श्रीमंत झाल्याचेही आपण पाहिलं आहे. पण असा एका आमदार आहे जो नागरिकांसाठी स्वतः कर्जबाजारी झाला आहे. इतकेच नव्हे तर तो स्वतः केवळ दोन खोल्यांच्या घरामध्ये राहतो.

मध्ये प्रदेश मधील जबलपूरच्या सिहोरा विधानसभेतील भाजपचे आमदार संतोष बरकडे यांनी देश आणि राज्यातील मंत्री आणि नेत्यांसमोर मोठा आदर्श ठेवला आहे. नागरिकांचे होणारे हालं पाहून संतोष बरकेड यांनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी एक एकर जागा विकत घेतली आणि हॉस्पिटल बांधण्यासाठी दान केली. या जमिनीची बाजारभाव 50 लाख रुपये आहे. विशेष म्हणजे त्यांनी ही जमीन घेण्यासाठी कर्ज काढले आहे.

bjp leader santosh barkade loan 50 lakh donated one acre land
Hathras Stamped: हाथरस दुर्घटनेचा तपास अहवाल SIT आज सरकारला सादर करणार, 100 हून अधिक जणांचे तपास अहवाल जबाब, काय कारवाई होणार?

तर असा निर्णय का घेतला

आमदार बरकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंडम तहसील हा प्रामुख्याने आदिवासी भाग आहे. येथे सुमारे 60 हजार लोकसंख्या आहे. येथे आदिवासी राहतात. अनेक वर्षांपासून येथे आरोग्य केंद्र बांधण्याची गरज होती. कोणताही आजार किंवा अपघात झाल्यानंतर रुग्णाला कुंडमपासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या जबलपूरला यावं लागत असं. यादरम्यान अनेक रुग्णांचा मृत्यू होत असे. विशेषत: गर्भवती महिलांना प्रसूती किंवा तपासणीसाठी जबलपूरला नेणे ही मोठी समस्या होती. त्यामुळे बरकडे यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.

bjp leader santosh barkade loan 50 lakh donated one acre land
Odisha : ओडिशात यंदा दोन दिवस ‘जग जगन्नाथ’;राज्यात ५३ वर्षांनंतर रथयात्रेच्या कालावधीत वाढ

आमदार झाल्यानंतर मला प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्यासाठी निधी आला. परंतु रुग्णालय बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही. हे ऐकल्यानंतर मी माझ्या जवळच्या मित्राशी या विषयावर चर्चा केली. त्यानंतर पडरिया गावाबाहेर सुमारे 50 लाख रुपये किमतीची एक एकर जमीन खरेदी केली आणि ती रुग्णालय बांधण्यासाठी दान केली.

bjp leader santosh barkade loan 50 lakh donated one acre land
Rahul Gandhi : काँग्रेसचे आता ‘मिशन दिल्ली’;राहुल गांधी यांनी साधला कामगारांशी संवाद

आमदार बरकडे पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. त्यांच्याकडे स्वत:साठी कोणतेही मोठे उत्पन्नाचे साधन नाही. हे ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हो. ते स्वतः दोन खोल्यांच्या घरात राहतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.