Arvind Kejriwal: "केजरीवालांच्या निवासस्थानी घडलं 'द्रौपदीचं वस्त्रहरण'"; भाजपच्या नेत्याचं वादग्रस्त विधान

अरविंद केजरीवालच नव्हे तर संपूर्ण इंडिया आघाडीनं स्वाती मालिवाल प्रकरणावर का मौन बाळगलं आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal esakal
Updated on

चंदीगड : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी आधुनिक काळातील द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, असं वादग्रस्त विधान भाजप नेते शेहजाद पुनावाला यांनी केलं आहे. पंजाबच्या चंदीगड इथं पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी याप्रकरणावरुन आम आदमी पार्टीसह इंडिया आघाडीवरही टीकास्त्र सोडलं. त्याचबरोबर त्यांनी इतर अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत. (BJP leader Shehzad Poonawalla says modern day Droupadi ka chirharan happened inside residence of Arvind Kejriwal)

पुनावाला म्हणाले, "गेल्या 10 दिवसांत तुम्ही आधुनिक काळातील 'द्रौपदीचं वस्त्रहरण' पाहिलं असेल, हे अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी घडलं. त्यामुळं केजरीवालांच्या या निवासस्थानाला आता 'शोषण-महल' असं म्हटलं जातं. सन २०१२ मधील निर्भया आंदोलनातून आपला जन्म झाल्याचा दावा करणारा आम आदमी पक्ष आता बिभव कुमार यांच्या पाठीशी उभा आहे, ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत.

Arvind Kejriwal
Sakal Games: कोडी सोडवा अन् मेंदूला द्या चालना, सकाळच्या दर्जेदार बातम्यांसह खेळा ऑनलाईन गेम्स

बिभव कुमार यांच्यासोबत असल्यानं केवळ अरविंद केजरीवालच नव्हे तर संपूर्ण इंडिया आघाडीनं स्वाती मालिवार प्रकरणावर का मौन बाळगलं आहे? इंडिया आघाडीनं हा आपचा अंतर्गत मामला असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसही या विषयावर शांत आहे, कारण या पक्षानंही ज्या प्रकारे महिलांचं शोषण केलं आहे. त्यामुळं आता स्वतः काँग्रेसची एक एक महिला कार्यकर्ता मग ती राधिका खेडा किंवा दीपा दुबे आहेत, त्यांनीही सांगितलं की काँग्रेसच्या कार्यालयात काय काय दुष्कृत्य घडू शकतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.