नागालँडमध्ये एनडीपीपी नेते नेफियू रिओ यांनी पाचव्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नागालँडमध्ये झालेल्या निवडणुकीत NDPP-भाजप युतीने ३७ जागा जिंकल्या आहेत. भाजपची एनडीपीपीसोबत युती केली आहे. २०१८ च्या निवडणुकीत रिओ यांनी भाजपसोबत युती केली होती. गेल्या निवडणुकीत युतीला ३० जागा मिळाल्या होत्या, यावेळी युतीने ३७ जागा जिंकल्या. मात्र, राज्यात सर्वपक्षीय सरकार स्थापन झाले आहे.
या मंत्रिमंडळात भाजपचे स्माइलिंग बुद्धा तेमजेन इमना अलोंग यांनी देखील शपथ घेतली आहे. नागालँड निवडणुकीत भाजप आघाडीच्या विजयाबद्दल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तेमजेन इमना अलोंग खूप आनंदी आहेत. नागालँड निवडणुकीत स्वतःसाठी आणि पक्षासाठी जागा जिंकल्याबद्दल त्यांनी एक मजेदार ट्विट देखील केले होते.
आपल्या राजकीय गोष्टी आपल्या गमतीशीर आणि विनोदी शैलीत सांगण्यासाठी तेमजेन इमना अलोंग प्रसिद्ध आहेत. यासोबतच ते त्याच्या पारंपरिक ड्रेसमध्ये सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. त्यांची शैली अनेकांना आवडते. सोशल मीडियावर त्यांचे अनेक फॉलोअर्स आहेत.
नागालँड सरकारच्या शपथविधी सोहळा आज पार पडला. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नागालँडचे राज्यपाल ला गणेशन, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा या शपथ ग्रहण सोहळ्याला उपस्थित होते.
७२ वर्षीय रिओ त्यांच्या राज्यात सर्वपक्षीय सरकारचे नेतृत्व करणार आहेत. राज्यात विरोधी पक्ष राहणार नाही. नागालँडमध्ये यापूर्वी दोनदा सर्वपक्षीय सरकार स्थापन झाले आहे.
जी कैटो आये, जेकब झिमोमी, केजी केन्ये, पी पायवांग कोन्याक, मेत्सुबो जमीर, तेमजेन इमना अलोंग, सीएल जॉन, सल्हौतुओनूओ क्रुसे आणि पी बाशांगमोंगबा चांग यांच्यासह नऊ आमदारांनी नागालँड मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.