पश्चिम बंगालमध्ये भाजपात फूट; 24 आमदार तृणमूलच्या वाटेवर

mamta banarjee suvendu adhikari.
mamta banarjee suvendu adhikari.
Updated on
Summary

पश्चिम बंगालचे भाजप नेता सुवेंदू अधिकारी यांनी सोमवारी पक्षाच्या आमदारांसोबत राज्यपाल जगदीप धनखड यांनी भेट घेतली होती.

कोलकाता- पश्चिम बंगालचे भाजप नेता सुवेंदू अधिकारी यांनी सोमवारी पक्षाच्या आमदारांसोबत राज्यपाल जगदीप धनखड यांनी भेट घेतली होती. यावेळी भाजपच्या 74 आमदारांपैकी फक्त 50 आमदार उपस्थित होते. 24 आमदार या बैठकीला गैरहजर होते. या बेपत्ता असलेल्या आमदारांमुळे भाजपची चिंता वाढली आहे. शिवाय राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. भाजपचे हे 24 आमदार सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ( BJP leader Suvendu Adhikari leadership not accepted 24 mla will join tmc)

विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेसला दणदणीत विजय मिळाला. तृणमूलने 200 पेक्षा अधिक जागा जिंकल्या. दुसरीकडे भाजपनेही मुसंडी मारली, पण त्यांना सत्तेच्या जवळपासही जाता आलं नाही. निवडणुकीच्या तोंडावर अनेक तृणमूलच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण, भाजप सत्तेत येऊ न शकल्याने नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपमध्ये गेलेले सुवेंदू अधिकारी यांचे नेतृत्व मान्य करण्यास काही आमदार तयार नसल्याचीही माहिती समजत आहे.

mamta banarjee suvendu adhikari.
कुंभमेळ्यात जीवाशी खेळ; एक लाख बनावट कोरोना रिपोर्ट

आमदारांच्या बैठकीतील गैरहजरीमुळे त्यांच्या टीएमसी प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आमदार पक्षावर नाराज आहेत. शिवाय आमदार मुकूल रॉय यांच्या मार्गावर जाण्याच्या प्रयत्नात आहे. मागील आठवड्यात मुकूल रॉय यांनी टीएमसीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांना मोठ्या मनानं पुन्हा स्वीकारलं. त्यांच्यानंतर आता राजीव बॅनर्जी, दिपेंदु विश्वास आणि सुभ्रांशु रॉय यांच्यासह इतर अनेक नेते टीमसीमध्ये पुन्हा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

mamta banarjee suvendu adhikari.
मायावतींना धक्का! बसपाच्या 9 आमदारांची बंडखोरी

ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, मुकुल रॉय यांच्यासोबत पक्ष सोडणाऱ्यांना पुन्हा टीएमसीमध्ये घेण्याबाबत विचार करण्यात येईल. भाजपचे 30 आमदार संपर्कात असल्याचा दावा टीएमसीकडून करण्यात आला आहे. मुकूल रॉय यांच्याआधी सोनाली गुहा आणि दिपेंदु बिस्वास यांनी उघडपणे पुन्हा टीएमसीमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली होती. दुसरीकडे, सुवेंदू अधिकारी यांनी राज्यात पक्षांतर विरोधी कायदा लागू करण्याची मागणी केली आहे. तसेच तोड-फोडीचे राजकारण तृणमूल काँग्रेस गेल्या 10 वर्षांपासून करत असल्याचं ते म्हणले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()