भाजप नेते तजिंदर पाल सिंह बग्गा यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
भाजप नेते तजिंदर पाल सिंह बग्गा (BJP leader Tajinder Pal Singh Bagga) यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. मोहाली न्यायालयानं बग्गांविरोधात नवीन अटक वॉरंट जारी केलंय. मोहाली कोर्टानं (Mohali Court) पंजाब पोलिसांच्या (Punjab Police) सायबर क्राइम ब्रँचला (Cyber Crime Branch) तजिंदर पाल सिंह बग्गाला अटक करून कोर्टात हजर करण्यास सांगितलंय.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील मोहालीच्या न्यायालयानं 7 मे रोजी दिल्ली भाजपचे (BJP) प्रवक्ते तजिंदर पाल सिंग बग्गा यांच्याविरोधात नवीन अटक वॉरंट जारी केलंय. मोहाली न्यायदंडाधिकाऱ्यांनी अटक वॉरंट जारी केलं असून पंजाब पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेला बग्गाला अटक करून न्यायालयात हजर करण्यास सांगितलंय.
साहिबजादा अजितसिंह नगर (Sahibzada Ajit Singh Nagar0 येथील फौजदारी न्यायालयाच्या नायक दंडाधिकारी प्रथमवर्ग न्यायालयानं बग्गा यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केल्याचं सांगण्यात येतंय. पंजाब पोलिसांच्या गुन्हे शाखेनं बग्गा यांच्याविरुद्ध कलम १५३ अ, ५०५, ५०५ (२) आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी न्यायालयानं बग्गा यांना अटक करून न्यायालयात हजर करण्याचं वॉरंट बजावलंय.
मोहाली कोर्टानं नवीन अटक वॉरंट जारी केल्यानंतर आता बग्गा यांच्यावर पुन्हा अटकेची टांगती तलवार लटकलीय. पंजाब पोलिसांचं पथक बग्गाला अटक करण्यासाठी कधीही दिल्लीला रवाना होऊ शकतं. दरम्यान, एक दिवसापूर्वी पंजाब पोलिसांनी तजिंदर पाल सिंह बग्गा याला अटक केली होती. यानंतर हे प्रकरण दिल्ली, हरियाणा आणि पंजाब या तीन राज्यांच्या पोलिसांमध्ये अडकलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.