उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप नेते राजधानीत

विधानसभेसाठी पहिली यादी याच आठवड्यात शक्य
 yogi adityanath
yogi adityanath Sakal
Updated on

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (Uttar Pradesh Assembly elections)उमेदवारांची यादी व प्रचार याबाबत सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने उद्या (ता.११) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)यांच्यासह पक्षनेत्यांची अत्यंत महत्त्वाची बैठक दिल्ली मुक्कामी बोलावली आहे. येत्या १३ तारखेला पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची (सीईसी) बैठक होणार असून त्यानंतर पहिली उमेदवारी यादी कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. भाजप अनेक आमदारांची तिकिटे कापू शकतो.

 yogi adityanath
ठेवीची रक्कम परत न केल्याने पतसंस्थेच्या संचालकांवर गुन्हा दाखल

योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)यांच्यासह यूपीतील प्रमुख भाजप नेते उद्यापासून किमान तीन दिवस दिल्ली मुक्कामीच असतील. योगी यांच्याच नेतृत्वाखाली लढविण्याचे भाजपने ठरविल्यावर साहजिकच भाजप उमेदवार ठरविण्यात त्यांच्या यादीतील उमेदवारांचा वरचष्मा राहणार हे सुद्धा स्पष्ट आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कमीत कमी उमेदवारांना तिकिटे देण्याबाबतही पक्षनेतृत्वाने राज्य नेतृत्वाला सूचना केल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार कोणत्याही निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार ठरविण्यासाठी जी महत्त्वाची सीईसी बैठक होते तीत पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत कमी बोलतात. राज्याच्या नेत्यांना प्रत्येक उमेदवाराबाबतची माहिती जास्तीत जास्त देता यावी यादृष्टीने मोदी फक्त राज्याच्या व अन्य नेत्यांची मते ऐकतात. त्यावर चर्चाही होते. एकदा एखाद्या उमेदवाराचे नाव निश्चित झाले की त्यात शक्यतो बदल करायचा नाही यावर मोदी व अमित शहा कटाक्ष असतो.

 yogi adityanath
लसीकरण केंद्रासाठी वेळेची मर्यादा नाही : केंद्राकडून स्पष्टीकरण

योगी, प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह, उपमुख्यमंत्री के. पी. मौर्य व दिनेश शर्मा, संघाचे प्रतिनिधी सुनील बन्सल आदी वरिष्ठ नेते उद्या दाखल होणार आहेत. त्यांची वरिष्ठ नेतृत्वाबरोबर बैठक होईल. तीत योगी यांच्या मनातील उमेदवार कोण असतील याचा अंदाज दिल्लीश्वरांना येईल. त्यानंतर सीईसी बैठकीत यावर चर्चा होऊन उमेदवारांची निश्चिती होईल अशा हालचाली आहेत.

मकर संक्रातीचा दिवस टाळणार?

उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत ५८ जागांवर मतदान होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्यास १४ जानेवारीपासून सुरवात होणार आहे. तो मकर संक्रांतीचा दिवस असल्याने भाजप पहिली यादी जाहीर करणे त्या दिवशी टाळेल असे जाणकार मानतात. त्याबरोबर दुसऱ्या टप्प्यात १४ फेब्रुवारीला ज्या ५५ जागांवर निवडणुका होणार आहेत, तेथील पक्षाच्या संभाव्य उमेदवारांचीही यादी घेऊन या, असे योगींसह अन्य नेत्यांना सांगण्यात आल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.