BJP News: भाजप नेता हवालदिल! पैसे, दागिने घेऊन बायको प्रियकरासोबत फरार

Crime News: राज हा महिलेचे आक्षेपार्ह फोटो काढून तिला ब्लॅकमेलिंग करायचा आणि तिला धमकीही देत होता. हे प्रकरण भाजप नेत्याला कळल्यानंतर त्याने राजला घरातून बाहेर काढलं आणि बायकोला समजावून सांगितलं. परंतु तिच्यावर काहीही परिणाम झाला नाही.
BJP News: भाजप नेता हवालदिल! पैसे, दागिने घेऊन बायको प्रियकरासोबत फरार
Updated on

BJP Leader Latest News: एका भाजप नेत्याची ४५ वर्षीय बायको ३० वर्षाच्या हवालदारासोबत पळून गेल्याची घटना घडली आहे. हवालदाराला भाड्याने रुम देणं भाजप नेत्याच्या अंगलट आलं आहे. सदरील महिला दागिने, पैसे घेऊन पसार झालीय.

भाजप नेत्याच्या बायकोने तब्बल अडीच कोटी रुपये सोबत नेले आहेत. उत्तर प्रदेशातल्या भदोहीमधील गोपीगंज येथे ही घटना घडली. विशेष म्हणजे भाजप अध्यक्षपदाची निवडणूक या महिलेने लढवली होती. त्या दोघांच्या नात्याची कुणकुण भाजप नेत्याला लागली होती, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.

गोपीगंजमध्ये घडलेल्या या घटनेची सोशल मीडियामध्ये चर्चा रंगली असून भाजप नेत्याने हवालदारावर गंभीर आरोप केले आहेत. त्याने पत्नीला फूस लावल्याचं सांगत बायकोच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे पोलिसांनी तातडीने हवालदाराचा शोध घेण्याची मागणी संबंधित नेत्याने केली आहे.

BJP News: भाजप नेता हवालदिल! पैसे, दागिने घेऊन बायको प्रियकरासोबत फरार
Saudi Arabia Warns Pakistan : तुमच्या भिकाऱ्यांना आवरा... सौदीचा पाकिस्तान सरकारला इशारा; धार्मिक व्हिसाच्या नावाखाली होतेय घुसखोरी

पळून जाताने महिलेने दागिने आणि पैसे तर नेलेच. याशिवाय तिच्या एका मुलाला सोबत नेलं आहे. दोन मुलं घरीच ठेवली आहेत. हवालदार हा त्यांच्याच घरामध्ये भाडेकरुन म्हणून राहात होता. एक वर्षापूर्वी दोघांची ओळख झाली होती. हवालदाराचं नाव विनय तिवारी उर्फ राज तिवारी असं आहे.

राज हा महिलेचे आक्षेपार्ह फोटो काढून तिला ब्लॅकमेलिंग करायचा आणि तिला धमकीही देत होता. हे प्रकरण भाजप नेत्याला कळल्यानंतर त्याने राजला घरातून बाहेर काढलं आणि बायकोला समजावून सांगितलं. परंतु तिच्यावर काहीही परिणाम झाला नाही. शेवटी दोघे पळून गेले. पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.