भाजप नेतृत्वाने तिकीट वाटपाचे बदलले निकष

‘यूपी’तील ५० आमदारांची तिकिटे वाचणार
amit shah
amit shahsakal
Updated on

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील पुढच्या(up election) टप्प्यातील भाजपच्या उमेदवार याद्या अंतिम करण्यासाठी आज गृहमंत्री अमित शहा(home minister amit shah) यांनी योगी आदित्यनाथ (cm yogi aditynath)यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. सूत्रांच्या मते भाजप सोडून जाणाऱ्या नेत्यांची वाढती संख्या पहाता तिकीट वाटपाच्या निकषांत पक्षनेतृत्वाने काही मूलभूत बदल केले आहेत. त्यामुळे किमान ५० आमदारांची तिकिटे वाचणार असे सांगितले जात आहे. योगी यांच्या राजवटीत ओबीसी व दलित वर्गाची वाढती नाराजी दूर करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपला ब्राह्मण मतपेढीही यंदा पूर्णांशाने मतदान करणार नाही, याचे संकेत मिळत आहेत. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी याची खुर्ची काढून घेण्याचे धाडस पक्ष दाखवत नाही. मात्र केवळ एखाद्या कलंकित मंत्र्याला वाचविणे म्हणजे १४ टक्के ब्राह्मण मतपेढीला गृहीत धरणे, असा अर्थ होत नसल्याचा मेसेज या समाजाने भाजप नेतृत्वाला(BJP leadership) दिला आहे.

amit shah
‘दया अर्ज’साठी घटना दुरुस्तीची गरज; ॲड. उज्ज्वल निकम

दरम्यान, भाजपने(bjp) आपल्या तिकीट वाटपाचे निकष बदलले आहेत. त्याच वेळी पहिल्या टप्प्यात जे १०५ उमेदवार जाहीर केले त्यात उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य(Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya) यांच्यासह किमान २५ उमेदवारांवर गंभीर व अतिगंभीर खटले दाखल असल्याचे पक्षाने मान्य केले आहे. राजकीय वैमनस्यातून दाखल होणारे खोटे गुन्हे हे त्याचे ठळक कारण आहे, असेही पक्षाने सांगितले आहे.

amit shah
कोरोना : लसीचा चौथा डोस ओमिक्रॉनवर प्रभावी नाहीच, चाचणीचा अहवाल उघड

नवीन निकष

  1. सरसकट तिकीट कापणार नाहीत

  2. गंभीर आरोप असणाऱ्यांची तिकिटे देखील कापली जाणार नाहीत

  3. ब्राह्मण मतपेढीला आकर्षित करण्याची रणनीती आखणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()