BJP : कर्नाटकमधील पराभवानंतर भाजप पुढील रणनीती जपून ठरवत आहे. मध्य प्रदेशमधील निवडणुकीसाठी स्वत: गृहमंत्री अमित शहा मैदानात उतरणार आहेत. भारतीय जनता पक्ष मतदारांमधील जो घटक असंतुष्ट आहे अशा घटकाला संघटनेत समाविष्ट करून घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. या घटकांसाठी कल्याणकारी उपाययोजना आणण्याचे प्रमाण वाढवण्यात येणार आहेत.
याचबरोबर राज्यातील आमदारांसोबत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मध्यप्रदेश, राजस्थान छत्तीसगड, तेलंगणामध्ये वर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणुका होणार आहेत. अश्यावेळी या असंतुष्ट घटकाला स्वतःकडे कसं वळवयाच? याकडे स्वतः भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा लक्ष ठेवून आहेत
जे.पी.नड्डा हे राजस्थान आणि तेलंगणाचे जबाबदारी स्वीकारणार असून केंद्रित गृहमंत्री अमित शहा हे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडची जबाबदारी सांभाळणार आहेत.
कर्नाटक मधून प्रेरणा घेत मध्यप्रदेश मध्ये भारतीय जनता पक्षाने 'लाडली बहना' योजना जाहीर केली आहे. या अंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांना दरमहा हजार रुपये दिले जाणार आहेत . याचबरोबर येत्या काळात एलपीजी गॅस सिलेंडरवर लाभ देण्याचे घोषणा भाजप करू शकतेे असे म्हटले जात आहे
तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्याने राजस्थानमधील निवडणुकांची तयारी देखील सुरू केली आहे. या ठिकाणी नक्की कोणते आश्वासन द्यायची याची तयारी केली जात आहे. छत्तीसगडमध्ये शेतकऱ्यांना काही फायदा देण्याच्या प्रयत्न करणार आहे. याशिवाय भाजप चार राज्यातील विधानसभा जागांचे प्रभारी म्हणून अनेक नाराज ज्येष्ठ नेत्यांची नियुक्ती करणार असल्याचे म्हटले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.