नवी दिल्ली- वेगळे मत्स्यपालन मंत्रालय बनवण्याचे वक्तव्य काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजप नेते गिरिराज सिंह यांनी आज लोकसभेत चांगलेच धारेवर धरलं. ते म्हणाले की, राहुल गांधींना शाळेत पाठवण्याची गरज आहे. तेव्हा त्यांना माहिती मिळेल की भारत सरकारमध्ये कोणकोणते विभाग काम करत आहेत. देशातील मत्स्यपालन क्षेत्राला चालणा देण्याच्या भाजप खासदार सुनिता दुग्गल यांच्या प्रश्वावर उत्तर देताना गिरिराज सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. राहुल गांधी यांनी 2 फेब्रुवारीला लोकसभेत या विभागासंबंधी प्रश्न विचारले, पण काही दिवसांनी ते विसरुन गेले की देशात असा एक विभाग काम करत आहे, अशी टीका गिरिराज यांनी केली.
माहिती नाही राहुल गांधी विसरभोळे आहेत की काय, राहुल गांधी यांनी 2 फेब्रुवारीला तारांकित प्रश्न केला होता, पण पुदुच्चेरी आणि कोचीमध्ये जाऊन त्यांनी मत्स्यपालन विभाग नसल्याचे म्हटले होते. मी सरकारमध्ये आलो तर यासाठी एक नवीन मंत्रालय बनवेन. राहुल गांधींना शाळेत पाठवण्याची गरज आहे. तेव्हाच त्यांना भारत सरकारमधील विभागांची माहिती मिळेल. मी संवैधानिक प्रश्व उपस्थित करत आहे, असं गिरिराज सिंह म्हणाले.
काँग्रेस विरुद्ध भाजप सरकार
गिरिराज सिंह यांनी काँग्रेसवर मत्स्यपालन क्षेत्राच्या वाईट अवस्थेचाही आरोप केला. ते म्हणाले की, 2014 पर्यंत राज्य करणाऱ्या सरकारने या विभागासाठी 3,682 कोटी रुपयांची तरतूद केली होती. दुसरीकडे मोदी सरकारने या क्षेत्रासाठी मोठी तरतूद केली. त्यांनी सहा वर्षांच्या काळात या क्षेत्रासाठी 32 हजार कोटी रुपये दिले आहेत. 1947 ते 2014 या काळामध्ये फक्त 100 लाख टन माशांचे उत्पादन झाले आहे. तर मोदी सरकारने गेल्या सहा वर्षात 150 टन माशांचे उत्पादन केले आहे.
काँग्रेसच्या नेत्यांना माहिती नाही की मत्स्यपालन विभाग कुठे आहे. मोदीजींनी 2019 च्या पूर्वी दोन विभाग बनवले होते. त्यात 32,572 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. देशाच्या इतिहासात यापूर्वी असं कधीही झालं नाही. मत्स्यपालन क्षेत्राचा विकास 10.87 टक्के दराने होत आहे, तर काँग्रेस शासनमध्ये 5.27 टक्क्यांनी विकास होत होता. दरम्यान, राहुल गांधी यांनी पुदुचेरीमध्ये म्हटलं होतं की, काँग्रेसचे सरकार येताच एक वेगळे मत्स्यपालन मंत्रालय बनवलं जाईल. यावरुन भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली. राहुल गांधी यांनी यावर स्पष्टीकरण देताना म्हटलं होतं की, मत्स्यपालनाचे वेगळे मंत्रालय बनवायचं आहे, विभागाबाबत मी बोलत नाहीये.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.