भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष नड्डा यांच्यासह राज्यातील नवीन केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठीचं त्यांचं सत्र सुरु आहे. यावरुनच राज्यातील प्रदेश अध्यक्ष बदलणार असल्याचं सामनामध्ये छापून आलं आहे. हेतुपरस्पर राजकीय दृष्ट्या अशा बातम्या पसरवल्या जात आहेत का? असा प्रश्न पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांना विचारला. यावर बोलताना ते म्हणाले की, 'याबाबत मला काही माहित नाही. पण आम्हाला अशा बातम्यांची काळजी करण्याची गरज वाटत नाही. त्यांच्या बातम्याकडे लक्ष द्यायची गरज नाही.' चंद्रकांत पाटील यांना मध्येच थांबवून राणे यांनी बोलायला सुरुवात केली. राणे त्यावर म्हणाले की, 'सत्तारुढ पक्षाने म्हणजेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेलं कार्य काहीही नसल्यामुळे देऊ शकत नाहीत. त्यामुळे माहिती द्यावी तर कुणाची द्यावी? त्यामुळे वाईट सवय असलेल्या संजय राऊत भाजपवर हेतुपरस्पर टीका करतात. त्यांच्या पक्षाचं सरकार असून लोकांसाठी सांगण्यासाठी कोणतीही विकासकामं नाहीत. त्यामुळेच भाजपला लक्ष केलं जातेय. '
भाजपमध्ये राज्याच्या अध्यक्ष बदलण्यावर कोणतीही चर्चा नाही. अध्यक्षपदाबाबत चर्चा तुम्ही पत्राकारच काढत आहात. नावं तुम्हीच काढता. दादा दिल्लीत माझं अभिनंदन करण्यासाठी आले आहेत. आम्ही एकाच पक्षाचे असल्यामुळे ते दिल्लीमध्ये अभिनंदन करण्यासाठी आले आहेत. यामध्ये कोणतीही मोठी गोष्ट नाही. यामध्ये कोणतेही राजकारण नाही, असे राणे म्हणाले.
संसदेचं कामकाज झाल्यानंतर महाराष्ट्रात आल्यानंतर राज्य सरकारचं काम आणि लोकांना मदत यावर तूमची भूमिका काय असेल? असा प्रश्न पत्रकारांनी नारायण राणे यांना विचारला. यावर बोलताना राणे म्हणाले की, महिनाभरापासून राज्य सरकारचे वाभाडे काढले नाहीत. 16 ऑगस्टनंतर महाराष्ट्रात जाणार आहे. त्यांचं जे काही काम चालू आहे, राज्य ज्या पद्धतीने अधोगतीकडे नेहण्याचं काम करत आहेत. त्यावर बोलण्याचा प्रयत्न करेन. राज्यातील लोकांना जागृत करेन. त्यातच केंद्रामध्ये महाराष्ट्राला दिलेल्या न्यायाबद्दलही माहिती देईन, असं यावेळी राणे म्हणाले.
तसेच राज्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर पुन्हा एकदा कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. चिपळूणसह कोकणमध्ये पुन्हा एकदा पाहणीसाठी जाणार आहे. मी कोकण दौऱ्यावर गेल्यानंतर आमच्या मंत्र्यांनी 700 कोटी रुपयांची मदत केली. अन् मुख्यमंत्री गेल्यानंतर फक्त दहा हजार रुपयांची मदत करण्यात आली. लोकांनी ते पैसे पिंपात टाकले, उद्धव ठाकरे यांच्या नावाने ते फुगून बाहेर येतील, अशी खिल्ली राणे यांनी ठाकरे सरकारची उडवली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.