Atul Bhatkhalkar: पंतप्रधान नाही पण विको वज्रदांतीचे ब्रँड ॲम्बेसडर होतील; भाजप आमदाराची राहुल गांधींवर टीका

यात्रेतील एका फोटोवरून भाजप आमदाराने राहुल गांधी यांची खिल्ली उडवली आहे
Atul Bhatkhalkar: पंतप्रधान नाही पण विको वज्रदांतीचे ब्रँड ॲम्बेसडर होतील; भाजप आमदाराची राहुल गांधींवर टीका
Updated on

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत असतानाच विरोधी पक्षांकडून वारंवार टीका करण्यात येत आहेत. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी अनेक फोटो त्यांच्या सोशल मिडियावर शेअर केले आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या ‘भारत जोडो यात्रे’ला तामिळनाडून सुरुवात झाली. ती आता केरळमधून कर्नाटकमध्ये पोहचली आहे. या यात्रेतील एका फोटोवरून भाजप आमदाराने राहुल गांधी यांची खिल्ली उडवली आहे.

कर्नाटकातील पदयात्रेदरम्यान राहुल गांधी यांचा ऊस खात असलेला एक फोटो व्हायरल झाला होता. यावरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत, “राहुल गांधी पंतप्रधान झाले नाहीत, होणारही नाहीत. पण विको वज्रदंतीचे ब्रँड ॲम्बेसडर नक्की होतील,” असा टोला लगावला आहे.

Atul Bhatkhalkar: पंतप्रधान नाही पण विको वज्रदांतीचे ब्रँड ॲम्बेसडर होतील; भाजप आमदाराची राहुल गांधींवर टीका
Sharad Pawar : भातखळकरांच्या मेंदूचा खळ झालाय; राष्ट्रवादीची 'भातखळकर स्टाईल' टीका

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली ‘भारत जोडो यात्रे’कर्नाटकमध्ये असून म्हैसूरमध्ये रविवारी संध्याकाळी झालेल्या जाहीरसभेत मुसळधार पाऊस सुरू असतानाही राहुल गांधी यांनी भाषण पूर्ण केले. ‘कन्याकुमारीपासून सुरू झालेली ही भारत जोडो यात्रा काश्मीपर्यंत जाणारच. यात्रेला कोणीही रोखू शकत नाही, अगदी पाऊसही नाही. आता पाऊस सुरू असतानाही आपल्या यात्रेत खंड पडलेला नाही’, असे राहुल गांधी भाषणवेळी म्हणाले होते. भारत जोडो यात्रा सुरू असताना अनेक विरोधी पक्षनेत्यानी राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.