BJP - Congress : 'ऑपरेशन कमला'चा उलटफेर, भाजपमधील अनेक आमदार काँग्रेसच्या वाटेवर, होणार घरवापसी

लोकसभा निवडणुकीवर होऊ शकतो परिणाम
PM Narendra Modi, Amit Shaha
PM Narendra Modi, Amit ShahaSakal
Updated on

बंगळुरू - कर्नाटकमध्ये यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला चांगलाच फटका बसला आहे. येत्या काळातही भाजपसमोरील आव्हाने वाढत असल्याची चिन्हे आहेत. भाजपमधील काही आमदार काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात सुरु आहे. ज्याचा फायदा काँग्रेसला पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत होऊ शकतो. 

त्याआधी होणाऱ्या बंगळुरूच्या नगर परिषदेच्या निवडणुकांवर देखील याचा प्रभाव पडू शकतो. मात्र भाजपची वाट यामुळे आणखी कठीण होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसमध्ये येऊ इच्छिणारे बहुतांश आमदार हे २०१९ मध्ये काँग्रेसमधून भाजपात गेले होते. ज्यामुळे काँग्रेस व जेडीएस यांचे युती सरकार पडले होते. हे आमदारही घरवापसी करणार असल्याची चर्चा आहे. 

PM Narendra Modi, Amit Shaha
Shivaji Maharaj Statue: कर्नाटकातला शिवरायांचा पुतळा तातडीनं बसवा अन्यथा महाराष्ट्रात.. भाजप नेत्याचा काँग्रेसला कडक इशारा

दरम्यान काँग्रेसच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, 'या सर्व आमदारांना टप्प्याटप्प्याने पक्षात घेतले जाणार आहे. याचा फायदा निवडणुकांचे वातावरण तापवण्यासाठी केला जाणार आहे.' या माहितीवर, भाजपचे यशवंतपूरचे आमदार एस. टी. सोमशेखर यांच्या प्रतिक्रियेमुळे शिक्कामोर्तब झाला आहे.

राज्याचे माजी सहकारमंत्री तथा उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या सोबत सोमशेखर कॅम्पगौडा विमानतळाच्या पाहणीच्या वेळी दिसले होते. 'शिवकुमार माझे गुरु आहेत. सहकार क्षेत्रात पुढे जाण्यासाठी त्यांनी मला मार्गदर्शन केले आहे.' असे ते म्हणाले होते. 

PM Narendra Modi, Amit Shaha
CAG Report: अब की बार 'मोदी सरकार' भ्रष्टाचाराच्या कचाट्यात, कॅगने केली 7 प्रकल्पांची पोलखोल!

२०१९ मध्ये भाजपात गेलेल्या काँग्रेसच्या १४ आमदारांपैकी सोमशेखर हे एक होते. त्यांच्याशिवाय शिवराम हेब्बर, बी. बसवराज, के गोपलैया व इतर काही आमदार भाजप सोडू शकतात. या सर्वांचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवकुमार यांच्याशी बोलणे झाले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

या सगळ्या चर्चांवर गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'याआधीही सोमशेखर यांनी काँग्रेससोबत काम केले आहे. मी प्रदेशाध्यक्ष असताना ते बंगळुरू शहराचे जिल्हाध्यक्ष होते. ते ३ वेळा आमदार होते. पक्षात राहिले असते तर आज मंत्रिपदावर असते. त्यांनी पक्षात येण्यावर कोणत्याही प्रकारची हरकत नाही.' 

PM Narendra Modi, Amit Shaha
Petrol Price: पेट्रोल होणार स्वस्त, निवडणुकीच्या तोंडावर महागाई रोखण्यासाठी मोदींची 1 लाख कोटी रुपयांची योजना तयार

याशिवाय आमदार मुनिरत्न देखील पक्षात येण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यांना आमदारपद सोडण्यास सांगण्यात आले आहे. मात्र आमदारपद सोडून त्यांना विधानपरिषद सदस्य व्हायचे नसल्याने ते पक्षात येणार की नाही यावर सध्या संभ्रम आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.