Rahul Gandhi : राहुल गांधींना घर मिळावं म्हणून भाजपाचे प्रयत्न; पंतप्रधान आवास योजनेचा अर्ज भरला!

आपल्याला घर नाही, आपण कायम सरकारी घरांमध्ये राहिलेलो आहे, असं विधान काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी केलं होतं.
Rahul Gandhi News
Rahul Gandhi Newsesakal
Updated on

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी माझ्याकडे घर नाही, असं विधान केलं होतं. त्यानंतर आता भाजपाने त्यांच्या नावाने एका घरासाठी अर्ज केला आहे. वायनाड भाजपाने कलपेट्टा च्या नगरपालिका सचिवांना एक निवेदन दिलं आहे.

भाजपा नेत्यांनी दिलेल्या अर्जामध्ये राहुल गांधींचा पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर आणि जमीन देण्याची विनंती केली आहे. भाजपाचे वायनाड जिल्ह्याचे अध्यक्ष केपी मधू यांनी सांगितलं की, ते राहुल गांधींसाठी कलपेट्टामध्ये एक घर आणि जमीन घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

Rahul Gandhi News
कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीचा दिवसभरातील निकाल पहा एका क्लिकवर

मधू पुढे म्हणाले की, वायनाड हे राहुल गांधींना आपलं घर बनवण्यासाठी आदर्श जागा आहे. तिथे सुट्टीमध्ये ते येऊ शकतात. काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनादरम्यान वायनाड इथून खासदार झालेले राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात म्हटलं की ५२ वर्षे झाली पण माझ्याकडे घर नाही.

राहुल गांधी म्हणाले होते, "घरी एक विचित्र वातावरण होतं.मी आईजवळ गेलो आणि तिला विचारलं की काय झालं? तेव्हा आईने मला सांगितलं की आपण घरातून निघत आहोत.तेव्हा मला वाटलं होतं की हे आपलं घर आहे. म्हणून मी आईला विचारलं की आपण आपलं घर का सोडतोय? तेव्हा आईने मला पहिल्यांदा सांगितलं की, हे आपलं नाही तर सरकारचं घर आहे आणि म्हणून आपल्याला हे सोडावं लागेल."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.