नवी दिल्ली- भाजपच्या एका नेत्याचे निधन झाले आहे. विशेष म्हणजे भाजपचे हे नेते लोकसभा निवडणूक लढवत होते. १९ एप्रिल रोजी त्यांच्या मतदारसंघात मतदान देखील झाले होते. उत्तर प्रदेशच्या मोरादाबाद मतदारसंघातील ही घटना असून सर्वेश सिंह असं भाजप उमेदवाराचे नाव आहे. सर्वेश सिंह हे ७२ वय वर्षांचे होते. ते एकवेळा खासदार आणि पाचवेळा आमदार राहिलेले आहेत. (BJP Moradabad candidate Sarvesh Singh died day after Uttar Pradesh constituency went to loksabha election polls)
मतदान पार पडल्यानंतर पुढच्याच दिवशी सर्वेश सिंह यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. सर्वेश सिंह हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. ते उपचारासाठी दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांनी पीटीआयला बोलताना सांगितलं की, सर्वेश कुमार यांचे निधन झाले आहे.
सर्वेश सिंह यांना घशासंबंधी समस्या होती, त्यांचे ऑपरेशन करण्यात आले होते. ते दिल्लीच्या एम्समध्ये शनिवारी चेकअपसाठी गेले होते, अशी माहिती चौधरी यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी सर्वेश सिंह यांच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केलं आहे. भाजपची भरुन न निघणारी हानी झाली आहे, असं ते म्हणाले आहेत.
मोरादाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सदर घटनेची दखल घेतली आहे. ते म्हणाले की, सर्वेश सिंह यांच्या निधनाचा निवडणूक प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही. निकालाच्या दिवशी म्हणजे ४ जून रोजी मतमोजणी होईल. सर्वेश सिंह विजयी झाले तर मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक घेण्यात येईल. तसेच, जर त्यांचा पराभव झाला तर पोटनिवडणूक घेण्याची वेळ येणार नाही.
सर्वेश सिंह हे २०१४ मध्ये पहिल्यांदा मोरदाबादमधून लोकसभेवर निवडून आले होते. त्यानंतर २०१९ मध्ये अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाच्या एसटी हसन यांनी त्यांचा पराभव केला होता. मतदारसंघामध्ये पाच विधानसभा आहेत. त्यांच्या विरोधात इंडिया आघाडीकडून समाजवादी पक्षाच्या रुची विरा या मैदानात आहेत. सर्वेश सिंह यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि एक मुलगी आहे. ( Loksabha Election News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.