Wrestlers Protest : "मी का शिलाजीतची भाकरी खातो का?" लैंगिक छळाच्या आरोपांवर बृजभूषण सिंह यांचे प्रत्युत्तर

BJP MP Brij Bhushan Singh
BJP MP Brij Bhushan Singh
Updated on

बृजभूषण सिंह यांच्यावर एका अल्पवयीन मुलीसह सात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे. दरम्यान बृजभूषण सिंह यांनी आरोप फेटाळले असून प्रत्युत्तर दिले आहे. बृजभूषण यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गेल्या नऊ दिवसांपासून जंतरमंतरवर कुस्तीपटूंचे आंदोलन सुरू आहे.

बृजभूषण म्हणाले, आधी हे म्हणत होते मी १०० मुलांचे शोषण केले. ते आता म्हणत आहेत १००० मुलांचे शोषण केले. मी काय शिलाजीतची भाकरी खातो का?, जंतरमंतरवर सुरू असलेले आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे.

बृजभूषण यांनी एका टीव्ही वाहिनीशी बोलताना हे स्पष्टीकरण दिले आहे. याबाबत एबीपी लाईव्हने वृत्त दिले आहे.

जंतरमंतरवर बसलेले पैलवान ब्रिजभूषण यांच्या अटकेची मागणी करत आहेत. ब्रिजभूषण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आता त्यांना अटक करण्यात यावी, असे त्यांचे म्हणणे आहे.

BJP MP Brij Bhushan Singh
Apmc Election Result: नगर जिल्ह्यात दिग्गजांना झटका! महाविकास आघाडीचा डंका; विखेंच्या वर्चस्वाला धक्का

कुस्तीपटूंच्या या विरोध प्रदर्शनाला आता राजकीय पाठबळही मिळत आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी जंतरमंतरवर पोहोचून पाठिंबा दर्शवला, तर आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी कुस्तीपटूंची भेट घेतली.

दिल्ली पोलिसांनी बृजभूषण यांच्याविरुद्ध सात महिला कुस्तीपटूंनी लावलेल्या लैंगिक छळ आणि धमकावण्याच्या आरोपांवरून दोन एफआयआर दाखल केले आहेत. लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यासह अनेक संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

BJP MP Brij Bhushan Singh
Devendra Fadnavis : राज्यातील जनतेला राज्य सरकारचं मोठं गिफ्ट; फडणवीसांनी दिली माहिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com