BJP Candidate List 2024 : तिकीट नाकारल्यानंतर माजी केंद्रीय मंत्र्याचा राजकारणातून संन्यास, ट्वीट करत म्हणाले...

Harsh Vardhan Quits Politics : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये अनेक विद्यमान खासदारांना आणि पक्षाच्या मोठ्या नेत्यांना डच्चू दिल्याचं समोर आलेलं होतं.
BJP Candidate List 2024
BJP Candidate List 2024esakal
Updated on

Harsh Vardhan Quits Politics : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये अनेक विद्यमान खासदारांना आणि पक्षाच्या मोठ्या नेत्यांना डच्चू दिल्याचं समोर आलेलं होतं. त्यानंतर आता भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्र्यांनी राजकारणाला रामराम ठोकल्याचं दिसून येतंय.

गौतम गंभीर आणि जयंत सिन्हा यांच्यानंतर दिल्लीतील वरिष्ठ नेते डॉ. हर्षवर्धन यांनीही राजकारणातून संन्यास घेण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. शनिवारी भाजपने जाहीर केलेल्या यादीतून हर्षवर्धन यांचं नाव वगळण्यात आलेलं होतं.

हर्षवर्धन यांच्याऐवजी पक्षाने प्रवीण खंडेलवाल यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर डॉ. हर्षवर्धन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक दीर्घ पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांचा राजकीय प्रवास सांगितला आहे.

BJP Candidate List 2024
Women's Day 2024: इंदूरमध्ये प्रशिक्षण, सीमेवर दहशत... 56 पुरुषांमध्ये अव्वल आलेली BSFची पहिली महिला स्नायपर आहे तरी कोण?

हर्षवर्धन यांनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?

  • ''तीस वर्षांपेक्षा जास्तीच्या राजकारणात मी पाच विधानसभा निवडणुका आणि दोन लोकसभा निवडणुका लढल्या.. ज्या मी अंतराने जिंकल्या. पक्ष, राज्य आणि केंद्र सरकारमध्ये महत्त्वाच्या पदांवर मला काम करता आलं.''

  • ''पन्नास वर्षांपूर्वी जेव्हा मी गरीब आणि गरजवंतांना मदत करण्याची प्रेरणा घेऊन मेडिकल कॉलेज, कानपूरमध्ये प्रवेश घेतला तेव्हा मानव जातीची सेवा, हाच माझा विचार होता.''

BJP Candidate List 2024
Oscar 2024 News : 'या' कारणासाठी यंदाचा 'ऑस्कर' ठरणार खास! काय आहे ती गोष्ट?
  • ''रांगेत उभ्या असलेल्या शेवटच्या माणसापर्यंत लाभ पोहोचावा, यासाठी मी प्रयत्न करीत राहिलो. तत्कालीन आरएसएस नेतृत्वाच्या आग्रहावरुन मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो. त्याचं कारण गरीबी, आरोग्य आणि अज्ञान याविरोधात लढण्याचा माझा प्रयत्न.''

  • ''मला काही आश्वासनं पूर्ण करायची आहेत.. काही मैल चालायचं आहे. माझं एक स्वप्न आहे आणि मला माहितंय की जनतेचा आशीर्वाद सदैव माझ्यासोबत राहील. शिवाय कृष्णा नगरमध्ये असलेलं माझं ईएनटी क्लिनिक माझ्या परतीची वाट बघत आहे.'' अशी पोस्ट माजी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()