Narendra Modi : गुजरात निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपने विजय नोंदवला आहे. भाजपच्या या विजयामागे नरेंद्र मोदींचं नियोजन पुन्हा एकदा यशस्वी होताना दिसून आले आहे. आज आम्ही नरेंद्र मोदींच्या गेल्या अनेक वर्षांपासून मिळत असलेल्या सातत्यपूर्ण विजया मागचं कारण सांगणार आहोत. गुजरातमधील विजययामागे आधुनिक तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. एकीकडे भाजपने ग्राऊंड लेव्हलवर भरपूर मेहनत घेतली, तर दुसरीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जोरदार प्रचार केला.
हेही वाचा- Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’
पंतप्रधान नरेंद्र मोदींना तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाची ताकद अगदी अचूक समजली आहे. ही बाब हेरत मोदींनी 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीतही याचा पुरेपूर वापर केल्याचे दिसून आले आहे. नरेंद्र मोदींनी राजकारणात अशा प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर पहिल्यांदा केला असे नाही. तर, याचा वापर ते गेल्या दोन दशकांपूर्वीपासूनच सुरू केला आहे.
1995 पासून वापर तंत्रज्ञानाचा वापर
नव्वदच्या दशकापासून पीएम मोदींना तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा राजकारणावर होणारा परिणाम चांगलाच समजला होता. 1995 च्या निवडणुकीत त्यांनी डॉसवर आधारित एक खास सॉफ्टवेअर विकसित केले होते, ज्यामध्ये गुजरातमधील विविध भागातील कामगारांची सर्व माहिती जतन करण्यात आली होती. भाजपचे कार्यकर्ते सर्वोदयभाई पाटीदार सांगतात की, त्यांनी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचा डेटा संकलित करण्यासाठी एक विशेष टीम तयार केली होती. याच्या माध्यमातून कामगारांचा डेटा आणि क्षमतेच्या आधारे त्यांना कामाचा भार देण्यात आला.
पीएम मोदी आणि इंटरनेट युगाची सुरुवात
2010 च्या सुरुवातीपासून नरेंद्र मोदी अनेकदा कामगारांना सांगत असत की, येणारे युग हे इंटरनेटचे असणार आहे. त्यामुळे Orkut, Facebook आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमचे खाते तयार करणे महत्त्वाचे आहे. 2010 च्या सुरुवातीला भाजप गुजरात राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी नेत्यांना त्यांचे जीमेल खाते आणि फेसबुक खाती तयार करण्यात मदत करण्यासाठी हेल्पडेस्कची व्यवस्था केली होती.
ऑडिओ संदेश आणि 3D रॅली
नरेंद्र मोदी 2002 पासून विधानसभा निवडणुकीच्या वेळी तंत्रज्ञानाचा चांगला वापर करत आले आहेत. 2002 च्या निवडणुकीत मी नरेंद्र मोदी आहे, ही निवडणूक खूप महत्वाची आहे त्यामुळे आपल्या बहुमोल मताची गरज आहे असा आवाज त्यांनी रेकॉर्ड करून घेतला होता. नरेंद्र मोदींचे हे आवाहन राज्यभरातील एसटीडी आणि पीसीओमध्ये ऑटोमॅटिक डायल म्हणून सेट करण्यात आले होते. 2012 मध्ये त्यांनी 3D रॅली सुरू केल्या.
नरेंद्र मोदींनी पारंपरिक माध्यमांना बाजूला सारून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि मुक्तपणे व्यक्त होण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला आणि आपल्या कार्यकर्त्यांनाही हाच संदेश दिला. भाजप कार्यकर्ता केयुरभाई चपटवाला सांगतात की, २०१२ मध्ये एका सभेत नरेंद्र मोदी म्हणाले होते की, तुमच्यापैकी अनेकांना तुमचे नाव, काम आणि तुमचे चित्र वर्तमानपत्रात प्रसिद्ध व्हावे असे वाटते. पण 10 पैकी फक्त 2 लोक वर्तमानपत्रात पोहोचतात. इतरांसाठी सोशल मीडिया लाँग लाइव्ह आहे. येथे तुम्ही तुमच्या कामाबद्दल सांगा. सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करा असे आवाहन केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.