भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात
Updated on
Summary

दोन वर्षांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत असून यामध्ये १२४ नेते सहभागी झाले आहेत.

२०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने तयारी सुरु केली आहे. यानिमित्त भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक रविवारी दिल्लीत होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा हे उपस्थित आहेत. जेपी नड्डा आणि पंतप्रधान मोदी यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. तब्बल दोन वर्षांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत असून यामध्ये १२४ नेते सहभागी झाले आहेत.

आगामी निवडणुकांबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. दरम्यान, कोरोनाकाळात मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभाही घेण्यात येणार आहे. तसंच पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाने बैठकीचा समारोप होणार आहे. गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमधील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत असलेले केंद्रीय मंत्री आणि सदस्य प्रत्यक्षात हजर होणार आहेत. इतर सदस्य व्हर्च्युअल पद्धतीने बैठकीला उपस्थित राहतील.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात
दिल्लीच्या जीवघेण्या प्रदूषणावरूनही राजकीय फटाके जोरात

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत आहे. यामध्ये आगामी निवडणुकीच्या रणनितीबाबत चर्चा होणार आहे. यात सध्याच्या मुद्द्यांवर संकल्प आणि प्रस्ताव मंजुर केले जातील. विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजप सत्ता कायम राखण्याचा प्रयत्न करेल. या निवडणुकांचे परिणाम त्यानंतर २०२४ ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर होणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.