BJP National Team : भाजप सरचिटणीसपदी विनोद तावडे कायम; मुंडे, रहाटकरांकडील जबाबदारीतही बदल नाही

महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर यांनाही पुन्हा चिटणीसपदी काम करण्याची संधी मिळाली
bjp national team pankaja munde vinod tawade pankaja munde vijaya rahatkar vasundhara raje j p nadda
bjp national team pankaja munde vinod tawade pankaja munde vijaya rahatkar vasundhara raje j p naddasakal
Updated on

नवी दिल्ली : भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीची आज घोषणा करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून विनोद तावडे यांना कायम ठेवण्यात आले असून ज्यांच्या नाराजीची सर्वाधिक चर्चा होते, त्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना चिटणीसपदी कायम ठेवण्यात आले आहे.

महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर यांनाही पुन्हा चिटणीसपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. भाजपच्या ३८ जणांच्या या कार्यकारिणीत नव्या- जुन्या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

काँग्रेसचे नेते ए. के. अँटोनी यांचे पुत्र अनिल अँटोनी यांना चिटणीसपदी नियुक्त करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दोन मुस्लिमांनाही या कार्यकारिणीत स्थान मिळाले आहे. आगामी चार राज्यांतील विधानसभा निवडणूक व पुढील वर्षी होऊ घातलेली सार्वत्रिक निवडणूक या पार्श्वभूमीवर हे बदल महत्त्वपूर्ण मानले जात आहेत.

अग्रवाल यांना संधी

सरचिटणीसपदामध्ये फारसे बदल केलेले नाहीत. यापूर्वी सरचिटणीस असलेले विनोद तावडे, कैलास विजयवर्गीय, तरुण चुघ, दुष्यंत गौतम व अरुण सिंह यांना त्याच पदावर कायम ठेवण्यात आले आहे. तेलंगणचे प्रदेश अध्यक्ष राहिलेले संजय बंडी यांची सरचिटणीसपदी वर्णी लागली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे विरोधक मानले जाणारे खासदार राधामोहन अग्रवाल यांना सरचिटणीसपदी संधी मिळाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती पण नंतर त्यांना राज्यसभेत घेण्यात आले. या कार्यकारिणीत दोन मुस्लिम नेत्यांना संधी देण्यात आली आहे. अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरू तारिक मन्सूर व केरळमधील अब्दुल्ला कुट्टी यांना उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे.

तीन माजी मुख्यमंत्र्यांना संधी

या नव्या कार्यकारिणीत तीन माजी मुख्यमंत्र्यांना स्थान देण्यात आले आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह व झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवरदास यांना उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. येत्या डिसेंबर महिन्यात राजस्थान व छत्तीसगडमध्ये निवडणुका होणार आहेत.

सुनील देवधर यांना डच्चू

जुन्या केंद्रीय कार्यकारिणीत चिटणीस असलेले व आंध्रप्रदेशचे प्रभारी संघ परिवारातील सुनील देवधर यांना मात्र नव्या कार्यकारिणीत स्थान मिळालेले नाही. त्रिपुरामध्ये भाजपचे जाळे विणण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली होती.

त्याचप्रमाणे कर्नाटकचे नेते सी. टी. रवी यांनाही या कार्यकारिणीत स्थान मिळाले नाही. रवी हे महाराष्ट्राचे प्रभारी होते. कर्नाटकचे असलेले भाजपचे संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष यांना कायम ठेवण्यात आले आहे. कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्याबद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या. परंतु पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर विश्वास कायम ठेवला आहे. सुनील देवधर यांना डच्चू

जुन्या केंद्रीय कार्यकारिणीत चिटणीस असलेले व आंध्रप्रदेशचे प्रभारी संघ परिवारातील सुनील देवधर यांना मात्र नव्या कार्यकारिणीत स्थान मिळालेले नाही. त्रिपुरामध्ये भाजपचे जाळे विणण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली होती.

त्याचप्रमाणे कर्नाटकचे नेते सी. टी. रवी यांनाही या कार्यकारिणीत स्थान मिळाले नाही. रवी हे महाराष्ट्राचे प्रभारी होते. कर्नाटकचे असलेले भाजपचे संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष यांना कायम ठेवण्यात आले आहे. कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्याबद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या. परंतु पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर विश्वास कायम ठेवला आहे.

कोणतीही राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी नसलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्तीला राष्ट्रीय पातळीवर सलग १२ वर्षे काम करण्याची संधी मिळू शकते, हे फक्त आणि फक्त भाजपमध्येच घडू शकते. माझ्यावर पक्षाने पुन्हा टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरविण्यासाठी मी समर्पित भावनेने सदैव मेहनत करत राहीन.

- विजया रहाटकर, राष्ट्रीय चिटणीस, भाजप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.