पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालय हे अनेक गैरप्रकारांसाठी कायम चर्चेत असतं. नुकतंच पुण्यातील कार अपघातात बिल्डरपुत्रानं दोन जणांचा बळी घेतल्याच्या घटनेत या अल्पवयीन आरोपीचं रक्ताचं सँपल बदलल्यावरुन ससून चर्चेत आलं होतं. आता याच ससून रुग्णालयातून एक रुग्ण उपचार सुरु असतानाच पळून गेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या रुग्णाच्या पत्नीनं तशी तक्रार दिल्याचं साम टीव्हीनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे.
डहाणूकडं जाणाऱ्या रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाडामुळं रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळं सध्या प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे. अनेक प्रवाशी प्लॅटफॉर्मवरच बसून राहिले आहेत.
स्वाती मालीवाल हल्ला प्रकरण: दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने बिभव कुमारची नियमित जामीन याचिका फेटाळली. न्यायालयाने फेटाळलेली ही दुसरी जामीन याचिका आहे. 27 मे रोजी त्यांची पहिली नियमित जामीन याचिका फेटाळण्यात आली.
शिवसेना लोकसभा गट नेते पदी कल्याण-डोंबिवली चे खासदार डॅाक्टर श्रीकांत शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आलीय. शिवसेना संसदीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलांय.
शिवसेना लोकसभा गटनेता निवडीसाठी संसदीय समिती सदस्य खासदार श्रीरंग बारणे यांनी डॅाक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी अनुमोदन दिले.
शिवसेना संसदीय समितीची बैठक संसद भवनातील शिवसेना पक्ष कार्यालयात पार पडली. या बैठकीत सर्व शिवसेना खासदारांनी एकमताने गट नेते पदी खासदार डॅाक्टर श्रीकांत शिंदे यांची निवड केली.
शिवसेना लोकसभा गट नेता निवड प्रक्रिया ही शिवसेना पक्षांतर्गत करण्यात आली आहे.लोकसभा सभापती यांची निवड झाल्यानंतर शिवसेना लोकसभा गट नेते पदाची अधिकृत निवड प्रक्रिया पार पडणार आहे.
देवेंद्र फडणीवस अमित शाह यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहे. त्यामुळे राजीनाम्यावर फडणवीस काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी बैठक सुरू झाली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांची एक तातडीची बैठक शनिवारी बोलावली आहे.
मेट्रो 2 आणि 7 ने नवा विक्रम रचला असून मार्गिका सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या एका दिवसात सर्वाधिक प्रवासी वाहतूक झाली आहे. गुरुवारी एका दिवसात तब्बल २ लाख ६० हजार ४७१ प्रवाशांनी प्रवास केला. मुंबईकर प्रवाशांची मेट्रो प्रवासाला पसंती मिळताना दिसून येत आहे. अंधेरी पूर्व गुंदवली ते अंधेरी पश्चिम नगर दरम्यान मेट्रो दोन आणि मेट्रो सात सेवा सुरू आहे.
एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली आहे.
आज व उद्या दक्षिण कोंकणात बहुतेक ठिकाणी, उत्तर कोंकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी व उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अबकारी धोरण मनी लॉन्ड्रिंग प्रकरण: अंमलबजावणी संचालनालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या रेग्युलर जामीन याचिकेवर उत्तर दाखल केले आणि जामीन अर्जाला विरोध केला. राऊस अव्हेन्यू कोर्टाने या प्रकरणातील युक्तिवाद पुढे ढकलला असून प्रकरण 14 जून रोजी सुनावणीसाठी लिस्ट करण्यात आले आहे.
दिल्ली : आज PM मोदींची NDA संसदीय समितीचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांनी संसदेबाहेर रंगांची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.
NDA संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर PM मोदी म्हणाले, 'NDA ही भारतातील सर्वात यशस्वी निवडणूकपूर्व आघाडी आहे. मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. एवढ्या मोठ्या समूहाचे स्वागत करण्याची संधी मला मिळाली ही आनंदाची बाब आहे. जे पक्ष विजयी झाले ते सर्व अभिनंदनास पात्र आहेत. मी खूप भाग्यवान आहे. एनडीएचा नेता म्हणून सर्व घटक पक्षांनी एकमताने माझी निवड करून मला नवीन जबाबदारी दिली आहे, त्यासाठी मी तुमचा खूप आभारी आहे. 2019 मध्ये मी एका गोष्टीवर भर दिला तो म्हणजे विश्वास. जेव्हा तुम्ही मला पुन्हा एकदा ही जबाबदारी द्याल, तेव्हा याचा अर्थ असा की आमच्यातील विश्वासाचा पूल अतूट आहे. हे अतूट नाते विश्वासाच्या भक्कम पायावर आधारित आहे. हे सर्वात मोठे भांडवल आहे.
दिल्ली: NDA संसदीय पक्षाच्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी NDA संसदीय पक्ष नेते म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील अनुमोदन दिले. तसेच अपना दल (एस) च्या अध्यक्षा अनुप्रिया पटेल यांनीही मोदींचे नाव देण्याच्या प्रस्तावाचे समर्थन केले.
नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. येत्या रविवारी ९ जून रोजी संध्याकाळी सहा वाजता नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा राजधानी दिल्लीत पार पडेल. एनडीएच्या संसदीय दलाची बैठक आज संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये झाली. यावेळी जे राजनाथ सिंह यांनी मांडलेल्या मोदींच्या नावाच्या प्रस्तावाला अमित शाह, नितीन गडकरी, एचडी कुमारस्वामी, चंद्राबाबू नायडू यांनी अनुमोदन दिले. हा १४० कोटी जनतेच्या मनातील प्रस्ताव असल्याच्या भावना शाहांनी व्यक्त केल्या. त्यानंतर संसदीय पक्षाच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड झाली. इथे क्लिक करा
एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीत टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू म्हणाले, "आम्ही आश्चर्यकारक बहुमत मिळवलं म्हणून आम्ही सर्वांचे अभिनंदन करतो. मी निवडणूक प्रचारादरम्यान पाहिले आहे, 3 महिन्यांपासून पंतप्रधान मोदींनी कधीही विश्रांती घेतली नाही. रात्रंदिवस त्यांनी काम केले आहे. त्याच भावनेने त्यांनी प्रचार केला आणि आंध्र प्रदेशात आम्ही 3 जाहीर सभा आणि 1 मोठी रॅली केली आणि त्यामुळे आंध्र प्रदेशात निवडणूक जिंकण्यात मोठा फरक पडला आहे.
अमित शाह म्हणाले, "लोकसभा निवडणुकीत पुन्हा विजय मिळवल्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नरेंद्र मोदी यांच्या नावाचा लोकसभेचा नेता, भाजप आणि एनडीए संसदीय पक्षाचा नेता म्हणून प्रस्ताव दिला आहे. याला माझा मनापासून पाठिंबा आहे, असे त्यांनी भाषणात स्पष्ट केले. यावेळी नितीन गडकरी यांनी देखील मोदींच्या नावाला अनुमोदन दिले.
नरेंद्र मोदी यांची NDA संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. चंद्राबाबू नायडू-नितीश यांच्या उपस्थितीत राजनाथ सिंह यांनी हा प्रस्ताव संसद भवनात मांडला.
एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात पोहोचले आहेत. एनडीएची ही बैठक जुन्या संसद भवनात होत आहे. मंचावर पंतप्रधान मोदी उपस्थित होते. राजनाथ सिंह, अमित शहा, चिराग पासवान, पवन कल्याण, चंद्राबाबू नायडू आणि जेपी नड्डा यांच्यासह सर्व खासदार आणि नेतेही त्यांच्यासोबत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी NDA संसदीय पक्षाच्या बैठकीसाठी पोहोचताना आदरपूर्वक भारतीय राज्यघटनेला नमन करत संविधानावर डोकं टेकवून आशीर्वाद घेतला आहे. नुकतेच त्यांची NDA नेते पदी निवड झाली आहे.
मनसेची पक्षांतर्गत निवडणूक पहिल्यांदाच ऑन कॅमेरा होणार असल्याची माहिती आहे. १४ जून रोजी मनसेची अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. राज्यात झालेल्या पक्ष फोडाफोडीच्या राजकारणामुळे निवडणूक आयोगाकडून ऑन कॅमेरा निवडणूक घेण्यास सांगितले आहे. यापूर्वी ऑफलाइन निवडणूक प्रक्रिया व्हायची परंतु आता ऑन कॅमेरा घेण्यात येणार आहे. या निवडणुकीला राज्यातील मनसे पदाधिकारी असतील तर ही निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार होणार आहे.
अजित पवार गटाने नाशिक शिक्षक मतदारसंघातून महेंद्र भावसार यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
शौचास बसण्याच्या कारणावरून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे बसू नको असे म्हटल्याचा राग अनावर होताच इसमावर जीवघेणा हल्ला केला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोळघर या गावातील घटना आहे. तीन जणांनी जीवघेणा हल्ला करत डोक्यावर गंभीर हल्ला केला. शौचास बसण्याच्या कारणावरून झालेल्या हल्ल्यात साठ वर्षीय कैलास साठे गंभीर जखमी झाले आहेत. जीवघेणा हल्ला प्रकरणी तीन जणांवर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या नवनियुक्त खासदारांची बैठक महाराष्ट्र सदनात पार पडणार होती. बैठकीनंतर सर्व खासदार आणि मुख्यमंत्री NDA बैठकीसाठी संसद भवनात बसमधून जाणार होते. मात्र, उशीर झाल्यामुळे ही बैठक महाराष्ट्र सदनात न घेता खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी भेटले. भेट घेऊन खासदार श्रीरंग बारणे, प्रतापराव जाधव, नरेश म्हस्के NDA बैठकीसाठी निघाले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत खासदार प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी अजित पवार पोहोचले आहेत. खासदार सुनील तटकरे आणि छगन भुजबळ देखील सोबत आहेत. तसेच आज एनडीएच्या बैठकीला अजित पवार देखील उपस्थित राहणार आहेत.
बुलढाण्यात किनगाव राजाजवळ जुन्या मुंबई नागपूर मार्गावर एका ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे. ही ट्रॅव्हल पुण्याहून नागपूरकडे जात होती. चिंतामणी ट्रॅव्हल्सची बस असल्याची माहिती आहे. चालकाचं ट्रॅव्हलवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे. बसमधील एकूण ३० प्रवासी जखमी झाले होते. त्यातील ८ गंभीर जखमी आहेत. त्यामुळे त्यांना जालना येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आलं आहे.
पंढरपुरमध्ये मुसळदार पाऊस पडला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून अनेक रस्ते बंद झाले आहेत. लोकांना प्रवासासाठी अडचण येत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पहिल्यांदा अजित पवार दिल्लीत आले आहेत.
धरणाच्या पाणी साठ्यात मोठी घट झाली आहे. त्यामुळे ठाण्यात १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांना पाणी जपून वापरावं लागणार आहे.
नवनीत राणा आणि रवी राणा हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून पराभव सहन करावा लागला आहे.
दिल्लीत एनडीएच्या खासदारांची आज बैठक होणार आहे. नरेंद्र मोदी यांची पक्षनेते पदी आज निवड केली जाणार आहे. मोदींचा शपथविधी ९ जून रोजी होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.