नवी दिल्ली - आर्थिकदृष्ट्या सशक्त असलेल्या महाराष्ट्रातील भाजपच्या सध्याच्या स्थितीमुळे दिल्लीतील भाजप श्रेष्ठी अधिक चिंतित असून भाजपचे बालेकिल्ले राहिलेले मतदारसंघातही भाजपची स्थिती चांगली नसल्याचे संकेत मिळाल्याने ही चिंता अधिक वाढली आहे.
येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होत असलेल्या महाराष्ट्र, हरियाना आणि झारखंडमध्ये भाजपचे सर्वाधिक लक्ष महाराष्ट्रावर आहे. भाजपचे महाराष्ट्रावर वर्चस्व राखण्यासाठी अनेक राजकीय प्रयोग केल्यानंतरही भाजपला हवे असलेले निकाल लागलेले नाही. उलट भाजपची स्थिती खराब झाली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत २३ खासदार असलेल्या भाजपला ९ खासदारांवर समाधान मानावे लागले होते.