BJP PM Narendra Modi Amit Shah Loksabha Election Uttar Pradesh
BJP PM Narendra Modi Amit Shah Loksabha Election Uttar PradeshESakal

Loksabha Result: सी-व्होटरचा सर्वात मोठा अंदाज, 4 जूनपूर्वीच लावला निकाल; भाजपच्या जागा होणार कमी

Uttar Pradesh: या चुकांमुळे भाजपला उत्तर प्रदेशातून ज्या विजयाची अपक्षा होती तो मिळताना दिसत नाही, असे लोक सांगत आहेत.

देशात सध्या लोकसभा निवडणुका सुरू आहेत. यामध्ये सहा टप्प्यांतील जागांवर मतदान झाले असून, शेवटच्या आणि सातव्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 4 रोजी आहे. त्यापूर्वी सर्वत्र निकालाचा अंदाज आणि एक्झिट पोलबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान C-Voter चे संस्थापक यशवंत देशमुख यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीतील कामगिरीबाबत धक्कादायक भाकित वर्तवले आहे. यामुळे भाजपच्या 400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे स्वप्न भंग होऊ शकते.

एबीपी न्यूज हिंदीशी बोलताना यशवंत देशमुख यांनी उत्तर प्रदेशमध्ये भाजप, समाजवादी पक्ष, बहुजन समाजवादी पक्ष आणि काँग्रेची कामगिरी कशी असेल यावर भाष्य केले.

देशमुख म्हणाले, उत्तर प्रदेश असे एकच राज्य आहे जिथे भाजपने जवळपास कोणत्याही विद्यमान खासदाराचे तिकिट कापले नाही. आणि हीच भाजपसाठी मोठी समस्या आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात भाजपचा खेळ बिघडू शकतो.

उत्तर प्रदेशात बसपा आणि काँग्रेसची कामगिरी कशी होईल यावर बोलताना देशमुख म्हणाले, मायावती यांच्या बसपने कितीही वाईट कामगिरी करू द्या, तरीही त्यांना काँग्रेसपेक्षा जास्त मते पडतील.

सी व्होटरचे यशवंत देशमुख मुलाखतीमध्ये म्हणाले, भाजपने उत्तर प्रदेशात ज्या विद्यमान खासदारांना तिकिटे दिली आहेत, ते खासदार खूपच अलोकप्रिय आहेत. तिकिट वाटपातील या चुकांमुळे भाजपला उत्तर प्रदेशातून ज्या विजयाची अपक्षा होती तो मिळताना दिसत नाही, असे लोक सांगत आहेत. उत्तर प्रदेशातील ही निवडणूक स्थानिक मुद्द्यांवर होत असल्याने बहुतांश जागांवर काट्याटी टक्कर होणार आहे.

BJP PM Narendra Modi Amit Shah Loksabha Election Uttar Pradesh
आधी ते हिंदूंशी लढले अन् आता ख्रिश्चनांशी... PM Modi यांनी रविवारच्या सुट्टीवरून कोणावर साधला निशाना?

यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत सहा टप्प्यामध्ये मतदान पार पडले असून, एक जूनला शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे.

दरम्यान संपूर्ण देशाच्या नजरा 4 जूनकडे लागल्या आहेत, कारण निवडणुकीचा निकाल त्यादिवशी लागणार आहे. 4 जूनला पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा विजय मिळवणार की काँग्रेसच्या नेतृत्त्ववाखालील आघाडीचा दहा वर्षांचा वनवास संपणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

BJP PM Narendra Modi Amit Shah Loksabha Election Uttar Pradesh
La Nina 2024: यंदाचा ऑगस्ट-सप्टेंबर अति पावसाचा! यावर्षीच्या मान्सूनबाबत IMD ने काय काय सांगितले?

2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने दमदार कामगिरी केली होती. उत्तर प्रदेशातील 80 पैकी 63 जागा जिंकल्या होत्या. विरोधी पक्षांमध्ये बहुजन समाज पक्षाने 9, समाजवादी पक्षाने 5 अपना दलाने 2 आणि काँग्रेसने 1 जागा जिंकली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com