Parliament Security Breach: संसदेत घुसखोरी प्रकरणाच्या मास्टरमाइंडचे TMC सोबत कनेक्शन? भाजपने शेअर केला फोटो

संसदेत झालेल्या घुसखोरीनंतर विरोधी पक्षांकडून भाजप आणि त्यांच्या खासदार प्रताप सिम्हा यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.
Parliament Security Breach
Parliament Security Breach
Updated on

संसदेत झालेल्या घुसखोरीनंतर विरोधी पक्षांकडून भाजप आणि त्यांच्या खासदार प्रताप सिम्हा यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. मात्र आता भाजपने इंडिया आघाडीचा हिस्सा असलेल्या तृणमूल काँग्रेसवर आरोप करत संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाइंड ललित झा याचा टीएमसी आमदारासोबतचा फोटो शेअर केला आहे.

भाजपने टीएमसी सोबतच संपूर्ण इंडिया आघाडीवर कटात सहभागी असल्याचा आरोप केला आहे. बंगालमध्ये भाजपचे अध्यक्ष डॉ.सुकांतो मजूमदार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर टीएमसी नेते तपस रॉय यांचा ललित झा सोबतच एक फोटो पोस्ट केला आहे. त्याच्या कप्शनमध्ये लिहीलं आहे की, आमच्या लोकशाहीच्या मंदिरावर हल्ल्याचा मास्टरमाइंड ललित झा याचे दिर्घकाळापासून टीएमसीच्या तपस रॉय यांच्यासोबत जवळचे संबंध आहेत, हा नेत्याच्या सहभागासाठी हा पुरेसा पुरावा नाही का?

या प्रकरणी भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, आतापर्यंत या संपूर्ण प्रकरणामध्ये सामील असलेल्या लोकांचे काँग्रेस, सीपीआय (माओवादी) आणि आता टीएमसीशी संबंध असल्याचे आढळून आले आहे. टीएमसीने प्रत्युत्तर देत म्हटले री, भाजपच्या अंतर्गत अपयशामुळे संसदेच्या सुरक्षेचा भंग झाला आहे.

Parliament Security Breach
Weather Update : येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, काही ठिकाणी गारपीट; शेतकऱ्यांची चिंता वाढली

ललित झाने केलं सरेंडर

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचं बोललं जाणारा ललित झा याने आत्मसमर्पण केलं आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतः पोलिस स्टेशन गाठले आणि आत्मसमर्पण केले. या घटनेचा व्हिडिओ बनवून ललित झा घटनास्थळावरून फरार झाला होता. तो बसने राजस्थानमधील नागौरला पोहोचला आणि तेथे तो त्याच्या दोन मित्रांना भेटला आणि एका हॉटेलमध्ये रात्र काढली. यानंतर पोलीस आपला शोध घेत असल्याचे लक्षात येताच तो बसने दिल्लीला आला आणि पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले.

पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे की आरोपी ललित झा याने चार आरोपींच्या वतीने ही घटना घडवून आणल्यानंतर त्याच्या एनजीओ पार्टनरला यासंबंधीचा व्हिडिओ देखील पाठवला होता. ललित झा पश्चिम बंगालमधील एका एनजीओमध्ये सचिव आहे.

Parliament Security Breach
Parliament Security Breach: "पंतप्रधान मोदी हेच लक्ष्य"; संसदेत घुसखोरी प्रकरणावर पोलिसांकडून न्यायालयात युक्तिवाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.