बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने एका कार्यक्रमात बोलताना राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिले. 2024 ची लोकसभा निवडणुकीत लढवण्याबाबतचा निर्णय तीने भाजपवर सोडला आहे. भाजपची इच्छा असेल तर ती निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे कंगनाने सांगितले. अभिनेत्रीच्या या वक्तव्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कंगनाचे स्वागत केले आहे. त्याचवेळी त्या सहभागी झाल्यास त्यांची जबाबदारी पक्षाकडून निश्चित केली जाईल, असेही स्पष्ट केले आहे.
याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर बोलताना जेपी नड्डा म्हणाले की, सर्वांनीच यावे अशी आमची इच्छा आहे, कारण पंतप्रधान मोदी हे आमच्या पक्षाचे नेते आणि पंतप्रधान आहेत. त्यांच्या प्रभावाने देशात चांगले वातावरण निर्माण झाले आहे. त्यांना यात सहभागी व्हायचे असेल तर त्यांचे स्वागत आहे. निवडणूक लढवण्याचा प्रश्न असेल तर तिकीट देण्याचा निर्णय माझा एकट्याचा नाही. विचारविनिमयाची प्रक्रिया खालपासून वरच्या स्तरापर्यंत जाते आणि नंतर ती संसदीय मंडळाकडे जाते. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, तेव्हाच्या परिस्थितीनुसार याबद्दल निर्णय घेतला जाईल.
कंगनाचे पक्षात स्वागत, पण...
हे लक्षात घेण्यासारखे आहे की कंगना गेल्या काही काळापासून भाजप आणि त्यांच्या नेत्यांना पाठिंबा देत आहे. त्याचबरोबर तीने काँग्रेसचा विरोधही केला आहे. अशा स्थितीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांना विचारण्यात आले की कंगनाला भाजपमध्ये स्थान असू शकते का? त्यावर ते म्हणाले की, होय, तिला स्थान आहे, पण कोणत्या जबाबदारीवर काम करायचे, हे पक्ष ठरवतो. कंगनाचे स्वागत आहे अशा प्रकारे आम्ही सर्वांना पक्षात घेतो. कोणालाही अटी लादून सामील करून घेतले जात नाही. पक्षात कोणी आले तरी त्याला नेहमी सांगितले जाते की, तुम्हाला कोणत्याही अटीशिवाय यावे लागेल, त्यानंतर पक्ष जबाबदारी निश्चित करेल.
कंगना काय म्हणाली होती?
लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात येण्यास तयार असल्याचे कंगनाने सांगितले होते. कंगनाने बोलताना पंतप्रधान मोदींचे कौतुक करतानाच राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावरही खरपूस समाचार घेतला. ती म्हणाली की, राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यात स्पर्धा नाही. त्यांची तुलनाही करू नये. दुसरीकडे, अरविंद केजरीवाल यांची खिल्ली उडवत कंगना म्हणते, हिमाचलच्या लोकांना मोफत वीज नको आहे. येथील लोक स्वतःची वीज बनवतात. राजकारणात येण्याच्या प्रश्नावर अभिनेत्री म्हणाली, परिस्थिती कशीही असेल, सरकारला माझा सहभाग हवा असेल, मग मी तो देईन आणि मी माझ्या सहभागासाठी तयार आहे. तिने पुढे सांगितले की मी हिमाचल प्रदेशच्या लोकांनी मला सेवेची संधी दिली तर ती नक्कीच भाग्याची गोष्ट असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.