द्रौपदी मुर्मू यांच्या पाठिंब्यासाठी जेपी नड्डांचा थेट सोनिया गांधींना फोन

Presidential Election
Presidential Electionesakal
Updated on
Summary

देशाच्या पुढील राष्ट्रपतीपदासाठी 18 जुलै रोजी निवडणूक होणार आहे.

नवी दिल्ली : एनडीएनं (NDA) ओडिशाच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (Presidential Election) उमेदवार म्हणून घोषित केलंय. तर, दुसरीकडं विरोधकांकडून यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांच्या नावाची घोषणा करण्यात आलीय.

दोन्ही पक्ष आता आपापल्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचं आवाहन करत आहेत. अशा परिस्थितीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (BJP national president JP Nadda) यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Congress President Sonia Gandhi) आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्याशी चर्चा केलीय. मिळालेल्या माहितीनुसार, नड्डा यांनी या दोन्ही नेत्यांना द्रौपदी मुर्मू यांना एकमतानं पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय.

Presidential Election
अग्निवीरांसाठी पेन्शन सोडण्यास तयार; भाजप खासदार वरुण गांधींची मोठी घोषणा

जेपी नड्डा यांनी सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, अधीर रंजन चौधरी, फारुख अब्दुल्ला आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्याशी फोनवरुन चर्चा केलीय. नड्डा यांनी या सर्वांना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची विनंती केली. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी राजकारण करू नये, राष्ट्र आणि समाजाच्या हितासाठी बिनविरोध निवड झाली पाहिजे, असं नड्डा यांनी सर्व नेत्यांना सांगितल्याचं बोललं जातंय.

Presidential Election
सेवानिवृत्त IAS परमेश्वरन अय्यर यांची NITI आयोगाचे नवीन CEO म्हणून नियुक्ती

18 जुलै रोजी राष्ट्रपदीपदासाठी निवडणूक होणार

विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. देशाच्या पुढील राष्ट्रपतीपदासाठी 18 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य आणि दिल्ली आणि केंद्रशासित प्रदेशांसह सर्व राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य असलेल्या इलेक्टोरल सदस्यांद्वारे राष्ट्रपतीची निवड केली जाते. सुमारे 10.86 लाख मतांच्या इलेक्टोरल मंडळात भाजपच्या नेतृत्वाखालील युतीला 48 टक्क्यांहून अधिक मतं असल्याचा अंदाज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()