अबब ! चक्क भाजप अध्यक्ष जेपी नड्डांच्या पत्नीची कार गेली चोरीला!

J.P.Nadda : आता चक्क बीजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची लग्झरीयस कार चोरीली गेली आहे.
अबब ! चक्क भाजप अध्यक्ष जेपी नड्डांच्या पत्नीची कार गेली चोरीला!
Updated on

JP Nadda: बीजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची लग्झरीयस कार चोरीली गेली आहे. दक्षिण पूर्व दिल्लीच्या गोविंदपुरी परिसरातून ही लग्झरीयस कार चोरीला गेली आहे.

दिल्लीमध्ये चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत असतात. अशावेळी दिल्लीकरांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमिच उपस्थित केला जातो. मात्र आता चक्क बीजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची लग्झरीयस कार चोरीली गेली आहे. यामुळे दिल्लीमध्ये चोरांवर कोणाचातरी अंकूश आहे की नाही? हा प्रश्न उपस्थित होत आहे. (car of BJP chief JP Nadda wife stolen )

अबब ! चक्क भाजप अध्यक्ष जेपी नड्डांच्या पत्नीची कार गेली चोरीला!
JP Nadda Resigns: जे पी नड्डा यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा; 'हे' कारण आलं समोर

मिळालेली माहीती अशी की, कार चालकाने गोविंदपुरी येथील एका सर्व्हिस सेंटरमध्ये सर्व्हिसींगसाठी कार पार्क केली होती. त्यानंतर तो जेवाण्यासाठी आपल्या घरी गेला. चालकाचे नाव जोगिंदर सिंग असे आहे तो गोविंदपुरी भागातच राहतो. मात्र घरातन तो जेव्हा परत आला तेव्हा त्याला कार त्या ठिकाणी दिसली नाही. १९ मार्च रोजी हा प्रकार घडला. ही घटना दुपारी ३ ते ४ च्या दरम्यान घडली.

चोरीला गेलेल्या गाडीचा क्रमांक HP-03-D-0021 असा आहे. ती पांढऱ्या रंगाची फॉर्च्युनर कार आहे. चालक जोगिंदरने क्षणाचाही विलंब न करता पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. जोगिंदरच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

अबब ! चक्क भाजप अध्यक्ष जेपी नड्डांच्या पत्नीची कार गेली चोरीला!
JP Nadda President Term : नड्डांच्याच हाती असणार 2024 लोकसभा निवडणुकीची सुत्रे! भाजपने वाढवला अध्यक्षपदाचा कार्यकाळ

माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता कार गुरुग्रामच्या दिशेने जाताना दिसली. वाहन जेपी नड्डा यांच्या पत्नीच्या नावावर नोंदणीकृत आहे. पोलिसांची सात पथके या प्रकरणाचा तपास करत आहेत.

अबब ! चक्क भाजप अध्यक्ष जेपी नड्डांच्या पत्नीची कार गेली चोरीला!
JP Nadda : भारताला विकसित देश बनविण्यात तरूणांनी योगदान द्यावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.