Karnataka : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह 'हे' 36 काँग्रेस नेते अडचणीत; कोर्टानं बजावलं समन्स

भाजप सरकारच्या विरोधात आंदोलनादरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी काँग्रेस नेत्यांवर गुन्हा दाखल केला होता.
DK Shivakumar Siddaramaiah
DK Shivakumar Siddaramaiahesakal
Updated on
Summary

कंत्राटदार संतोष पाटील यांच्या मृत्यूप्रकरणी मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी करत काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने केली.

बंगळूर : भाजपच्या रेट कार्ड बदनामीप्रकरणी (BJP Rate Card Case) मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar), प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला यांच्यासह ३६ नेत्यांना न्यायालयीन समन्स बजावले आहेत.

बंगळूर येथील लोकप्रतिनिधी न्यायालयाने (Bangalore Court) समन्स जारी केले असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांना २८ जुलै रोजी प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी भाजप सरकारच्या विरोधात आंदोलनादरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी काँग्रेस नेत्यांवर गुन्हा दाखल केला होता.

DK Shivakumar Siddaramaiah
Kolhapur Airport : CM शिंदेंच्या भेटीसाठी 'हा' माजी मंत्री विमानतळाबाहेर तासभर ताटकळत उभा राहिला!

आता लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने हे प्रकरण सुनावणीस योग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे. काँग्रेस नेत्यांवर दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी २७ जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे. भाजपच्या वतीने वकील विनोद कुमार यांनी याचिका दाखल केली. न्यायमूर्ती जे. पीत यांच्या खंडपीठाने खटल्याला परवानगी दिली.

DK Shivakumar Siddaramaiah
धक्कादायक! सासूचं ऐकून मुलीनं आईचा घोटला गळा; ट्रॉली बॅगेत मृतदेह घालून थेट पोहोचली पोलिस ठाण्यात

कंत्राटदार संतोष पाटील यांच्या मृत्यूप्रकरणी मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी करत काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने केली. या पार्श्वभूमीवर ३६ काँग्रेस नेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे. बंगळूरमधील हाय ग्राउंड्स पोलिस स्टेशनमध्ये काँग्रेस नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भाजपतर्फे विवेक सुब्बारेड्डी यांनी युक्तिवाद केला.

DK Shivakumar Siddaramaiah
Eknath Shinde : 'त्या' जाहिरातीवरुन वाद पेटणार? CM शिंदे म्हणाले, फडणवीस आणि आमच्यात कोणतेही मतभेद..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.