नवी दिल्ली- भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी ७२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश आहे. राज्यातून कुणाला संधी मिळेल याबाबत उत्सुकता होती. भाजपने विद्यमान ४ खासदारांचा पत्ता कट केला आहे. तर, प्रीतम मुंडे, गोपाळ शेट्टी, मनोज कोटक, उन्मेश पाटील या खासदारांना तिकीट नाकारण्यात आलं आहे.
भाजपकडून काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलीये. यात पंकजा मुंडे, मुरलीधर मोहोळ, सुधीर मुनगंटीवार, अनुप धोत्रे यांना भाजपकडून तिकीट मिळालं आहे. हे नेते अनुक्रमे, बीड, पुणे, चंद्रपूर आणि अकोला या मतदारसंघातून निवडणूक लढवतील. (BJP releases Loksabha election candidate Second List Which leaders in Maharashtra got chance)
बीडमध्ये प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापून त्यांच्याच बघिनी पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आली आहे. उत्तर मुंबईमधून गोपाळ शेट्टी यांना पत्ता कट करुन पियूष गोयल यांना संधी देण्यात आली आहे. उत्तर पूर्व मुंबईमधून मनोज कोटक यांना उमेदवारी न देता मिहीर कोटेजा यांना तिकीट देण्यात आलंय. जळगावमधून उन्मेश पाटील यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना संधी देण्यात आली आहे.
भाजपने पुण्यातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना संधी दिली आहे. दिवंगत गिरीश बापट यांच्या निधनानंतर या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली नव्हती. भाजपकडून मोहोळ यांनाच उमेदवारी मिळेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गेल्यावेळी चंद्रपूरमधून हंसराज अहिर पराभूत झाले होते. त्यामुळे आता सुधीर मुनगंटीवार यांना पहिल्यांदा संधी देण्यात आली आहे.
भाजपने तुर्तास महायुतीत वाद नसलेल्या २० जागांवर उमेदवारी जाहीर केली आहे. महायुतीमध्ये भाजप किती जागांवर निवडणूक लढवेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळतील हे ही अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तिन्ही पक्षांमध्ये अधिकाधिक जागा मिळण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे भाजपला पुढील यादी जाहीर करताना मोठी कसरत करावी लागणार आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.