झारखंड निवडणुकीसाठी भाजपकडून जाहीरनामा प्रसिद्ध; आता 'लाडक्या दीदी'ला मिळणार महिन्याला 2100 रुपये

Jharkhand Assembly Elections : निवडून आल्यास भाजप झारखंडमधील प्रत्येक महिलेला गोगो दिदी योजनेअंतर्गत दरमहा २ हजार १०० रुपये देण्यात येणार आहेत.
Jharkhand Assembly Elections
Jharkhand Assembly Electionsesakal
Updated on
Summary

दिवाळी आणि रक्षाबंधन अशा सणांसाठी महिलांना मोफत गॅस सिलिंडर दिले जातील. यासोबतच राज्यातील पाच लाख तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासनही भाजपने दिलेय.

रांची : झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी (Jharkhand Assembly Elections) केंद्रीय गृहमंत्री यांनी रविवारी भाजपचा जाहीरनामा (BJP Manifesto) प्रसिद्ध केला. यामध्ये महाराष्‍ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर ‘लाडकी दीदी’ योजनेची (ladki Didi Yojana) घोषणा करण्यात आली आहे. यात महिलांना २१०० रुपये देण्यात येणार आहे. यावेळी देशभरात समान नागरी संहिता (यूसीसी) लागू करून बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करणारच, असा निर्धार अमित शहा यांनी व्‍यक्त केला. मात्र, आदिवासींना यूसीसीमधून वगळण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.