"शहजादाला आता नवाब व्हायचं आहे आणि नवाब होण्यासाठी शहजादानं ईस्ट इंडिया कंपनीची मदत घेतलीये.''
राहुल गांधींनी आपल्या वक्तव्यातून भारतातील लोकशाहीच्या रक्षणासाठी बाहेरच्या देशांना येण्याचं खुलं आमंत्रण दिलं आहे. मणिशंकर अय्यर आणि राहुल गांधी हेच करत आहेत. दोघंही भारताची बदनामी करत आहेत.
नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) लंडनमध्ये भारताच्या लोकशाहीवर केलेल्या वक्तव्यामुळं चर्चेत आहेत. राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी भाजप सातत्यानं करत आहे.
तर, दुसरीकडं भाजपनं आता राहुल गांधींची तुलना मीर जाफरशी केलीये. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा (Sambit Patra) यांनी आज (मंगळवार) सकाळी पत्रकार परिषदेत राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला.
संबित पात्रा म्हणाले, "शहजादाला आता नवाब व्हायचं आहे आणि नवाब होण्यासाठी शहजादानं ईस्ट इंडिया कंपनीची मदत घेतलीये. राहुल गांधी माफी न मागता निघून जातील. मात्र, त्यांना माफी ही मागावीच लागेल.''
संबित पुढं म्हणाले, राहुल यांना राफेल प्रकरणातही माफी मागावी लागली होती आणि आज त्यांना संसदेतही माफी मागावी लागेल. मीर जाफरनं नवाब बनण्यासाठी काय केलं होतं, तेच राहुल गांधी लंडनमध्ये करत आहेत. शहजादा नवाब बनना चाहता है असं म्हणत आजच्या मीर जाफरला माफी मागावी लागेल, असा त्यांनी इशारा दिला आहे.
हे काँग्रेस आणि राहुल गांधींचं षडयंत्र असल्याचंही भाजप नेत्यानं म्हटलंय. त्यांचा संसदेतील सहभाग अत्यल्प असून त्यांना कोणी बोलू देत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. राहुल गांधींनी आपल्या वक्तव्यातून भारतातील लोकशाहीच्या रक्षणासाठी बाहेरच्या देशांना येण्याचं खुलं आमंत्रण दिलं आहे. मणिशंकर अय्यर आणि राहुल गांधी हेच करत आहेत. दोघंही भारताची बदनामी करत आहेत. मीर जाफरनं नवाब होण्यासाठी काय केलं? आपली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी त्यानं ईस्ट इंडिया कंपनीची मदत घेतली, असंही संबित पात्रा म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.