Smriti Irani News : 'मला नाही, त्यांना लाज वाटायला हवी'; 'फ्लाइंग किस' प्रकरणी स्मृती इराणींचा पुन्हा हल्लाबोल

BJP Smriti Irani Again Criticize Rahul Gandhi over flying kiss row says shame on him not me
BJP Smriti Irani Again Criticize Rahul Gandhi over flying kiss row says shame on him not me
Updated on

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राहुल गांधींच्या कथित फ्लाइंग किसचा मुद्दा अजूनही चर्चेत आहे. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी या प्रकरणावरून पुन्हा एकद काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. ते घृणास्पद वर्तन असल्याचे शनिवारी (१९ऑगस्ट) इराणी यांनी म्हटले आहे.

एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना स्मृती इराणी यांनी फ्लाइंग किस प्रकरणावर पुन्हा भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या, जो व्यक्ती संसदेत सभ्य वर्तन करू शकत नाही. ही घटना त्याच्यासाठी (राहुल गांधी) लाजिरवाणी आहे माझ्यासाठी किंवा इतर कोणत्याही महिला खासदारासाठी नाही. त्यांना लाज वाटायला हवी.

राहुल गांधींचे नाव न घेता स्मृती इराणी म्हणाल्या की, गांधी घराण्यातील एखाद्याला कदाचित संसदेत स्वारस्य नसेल, परंतु तुम्ही कल्पना करू शकता का की एक महिला कॅबिनेट मंत्री जी त्यावेळी तिथे होती, तिला त्या व्यक्तीने असे का केले? याबद्दल चांगले बोलावे लागत आहे. मी हे का करू? ही माझ्यासाठी नाही तर त्यांच्यासाठी लाजिरवाणी बाब आहे.

स्मृती इराणी पुढे म्हणाल्या, जिथे हे सर्व घडले ते संविधानाचे सर्वात प्रतिष्ठित ठिकाण आहे. तेथे महिलांच्या सन्मानासाठी कायदे केले जातात. स्मृती इराणी यांनी स्वतः आणि राहुल गांधी यांच्यातील राजकीय वादावर देखील भाष्य केले. त्या म्हणाल्या की, राजकीय संघर्ष हा बरोबरीच्या व्यक्तींमध्ये असतो. ते त्यांच्या पक्षाचे मालक आहेत. मी माझ्या पक्षाची (भाजप) कार्यकर्ता आहे.

BJP Smriti Irani Again Criticize Rahul Gandhi over flying kiss row says shame on him not me
Viral Video : टीव्ही अँकरचा टॉमॅटो दरवाढीवर प्रश्न अन् स्मृती इराणींनी करून दिली थेट तुरूंगाची आठवण

काय आहे संपूर्ण प्रकरण?

विशेष म्हणजे, संसदेचे सदस्यत्व बहाल करण्यात आल्यानंतर राहुल गांधी यांनी संसदेच्या नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात अविश्वास प्रस्तावावर भाषण दिले होते. यावेळे सभागृहाबाहेर जाताना त्यांनी भाजपच्या महिला खासदाराला फ्लाइंग किस दिल्याचा आरोप भाजपने केला होता.

त्यावेळी स्मृती इराणी याही सभागृहात उपस्थित होत्या आणि त्यांनी त्याच वेळी त्यावर तीव्र आक्षेप घेतला. त्यानंतर केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार शोभा करंदलाजे आणि पक्षाच्या इतर महिला सदस्यांनी या घटनेबाबत राहुल गांधी यांच्या विरोधात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केली होती.

BJP Smriti Irani Again Criticize Rahul Gandhi over flying kiss row says shame on him not me
Rahul Gandhi News : लडाखमध्ये चीनच्या सैन्याने घुसखोरी केलीय; राहुल गांधीचा मोठा दावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.