'महाराष्ट्र, झारखंड, राजस्थानपाठोपाठ टीएमसीचीही शिवसेनेसारखीच अवस्था होईल'

Suvendu Adhikari vs Uddhav Thackeray
Suvendu Adhikari vs Uddhav Thackerayesakal
Updated on
Summary

एकनाथ शिंदे यांच्यासह सत्ताधारी शिवसेनेचे अनेक बंडखोर आमदार आसाममध्ये तळ ठोकून आहेत.

कोलकाता : महाराष्ट्रात राजकीय (Maharashtra Politics) पेच कायम आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह सत्ताधारी शिवसेनेचे अनेक बंडखोर आमदार आसाममध्ये तळ ठोकून आहेत. बंडखोर आमदार महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा दावा करत आहेत.

दरम्यान, भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी दावा केलाय की, पश्चिम बंगालमध्ये टीएमसीलाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. ममता बॅनर्जींचा (Mamata Banerjee) कार्यकाळ संपण्यापूर्वी महाराष्ट्रासारखी परिस्थिती निर्माण होईल. झारखंड आणि राजस्थान या बिगरभाजप राज्याचीही तीच अवस्था होणार आहे, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.

Suvendu Adhikari vs Uddhav Thackeray
महाराष्ट्रच नव्हे, तर उत्तर प्रदेशपासून दिल्लीपर्यंत देशातील 'ही' राजकीय घराणी संकटात

'आधी महाराष्ट्रातील ही परिस्थिती निवळू दे..'

सुवेंदू अधिकारी यांनी टीएमसीच्या विधानावर नाराजी व्यक्त केलीय. कूचबिहार जिल्ह्यात एका रॅलीला संबोधित करताना सुवेंदू अधिकारी म्हणाले, आधी महाराष्ट्रात ही परिस्थिती दूर होऊ द्या. मग, झारखंड आणि राजस्थानची पाळी येईल. त्यानंतर पश्चिम बंगालचा क्रमांक येणार आहे. इतर विरोधी सत्ता असलेल्या राज्यांसारखीच परिस्थिती असणार असून हे सरकार 2026 पर्यंत चालणार नाही तर सरकार 2024 पर्यंत पडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

Suvendu Adhikari vs Uddhav Thackeray
विधानसभेत अग्निपथ योजनेविरोधात ठराव आणणार; मुख्यमंत्री मान यांची मोठी घोषणा

'भाजपनं महाराष्ट्राला अडचणीत आणलंय'

वरिष्ठ टीएमसी खासदार आणि पक्षाचे मुख्य प्रवक्ते सुखेंदू शेखर म्हणाले, सुवेंदू अधिकाऱ्यांच्या वक्तव्यावरून स्पष्टपणे दिसून येतं की, भाजपनं महाराष्ट्राला संकटात टाकलंय. पश्चिम राज्यातील राजकीय संकटामागं भाजपचा हात असू शकतो, हे या वक्तव्यावरून सिद्ध होतंय. देशातील प्रत्येक विरोधी शासित राज्यातील वाईट परिस्थितीला भाजपच जबाबदार आहे. त्याला देशातील जनता चोख प्रत्युत्तर देईल, असा टोला त्यांनी लगावलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.