PM Modi: 'सर्व गैरसमज दूर होतील अन्...', दक्षिण भारतात जास्तीत जास्त आमच्या जागा येतील, PM मोदींनी व्यक्त केला विश्वास

PM Modi: लोकसभा निवडणुका सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीदरम्यान मोठा दावा केला आहे. दक्षिण भारतात भाजपला सर्वाधिक जागा मिळतील, असा दावा मोदी यांनी केला आहे. याशिवाय एनडीए लोकसभेच्या 400 हून अधिक जागा जिंकणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला आहे.
PM Modi
PM ModiEsakal
Updated on

दक्षिण भारतात भाजपला सर्वाधिक जागा मिळतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. याशिवाय एनडीएला 400 हून अधिक जागा मिळतील, असा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला आहे. आमची रणनीती संपूर्ण देशासाठी सारखीच असल्याचे ते म्हणाले आहेत. पुन्हा एकदा मोदी सरकार आणि 4 जून रोजी 400चा आकडा पार करेल असंही त्यांनी म्हटलं आहे. रविवारी रात्री पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत पीएम मोदी म्हणाले की, दक्षिण भारतातील राज्यांमध्ये आमची दाकद दाखवू आणि भाजपची दक्षिण भागात ताकद नाही हा गैरसमज यावेळी आम्ही मोडीत काढू. पीएम मोदी म्हणाले, तुम्ही फक्त 2019 च्या निवडणुका बघा. भाजप हा दक्षिण भारतातील सर्वात मोठा पक्ष होता. यावेळीही तसेच होईल, असे आम्ही म्हणतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही निवडणुकीत दक्षिण भारतात जास्तीत जास्त जागा जिंकू आणि फरक देखील गेल्या वेळेपेक्षा जास्त असेल. संपूर्ण प्रदेशात भाजपची मतांची टक्केवारी आणि जागा या दोन्हींमध्ये वाढ झाल्याचे आपण पाहाल. देशातील लोकसभेच्या एकूण ५४३ जागांपैकी १३१ जागा दक्षिण भारतातील राज्यांमधून येतात. भाजपचे एकूण 29 लोकसभा खासदार येथून आहेत. आम्ही पूर्व भारतातही मोठे यश मिळवू. त्यामुळे दिल्लीपासून भुवनेश्वर, कोलकातापर्यंत अनेकांची झोप उडाली आहे, असंही ते म्हणालेत.

PM Modi
IT Raid: चप्पल व्यावसायिकाच्या घरावर छापेमारी; 500च्या नोटांच्या गड्डीवर खास चिन्ह; पोलीस अधिकारीही चक्रावले

काँग्रेस अनेक राज्यांत आपला खातंही उघडू शकणार नाही, शून्य जागा मिळतील

आम्हाला जनतेचे इतके आशीर्वाद मिळत आहेत की, आम्ही विक्रम मोडू. आम्ही देशभरात पूर्वीपेक्षा जास्त जागा आणू. हे विशेषतः पूर्व आणि दक्षिण भारतात होईल. एनडीए निश्चितपणे 400 पार करेल. पंतप्रधान म्हणाले की, आतापर्यंत ज्या टप्प्यांमध्ये मतदान झाले आहे. त्यांच्या विश्लेषणातून असे दिसून येते की, एनडीएचा मुख्य केंद्रबिंदू आहे. तर आघाडी करूनही काँग्रेस अनेक राज्यांत आपले खातेही उघडू शकलेली नाही, असंही पुढे मोदी म्हणालेत. तर पुढे ते म्हणाले, भाजप हा पहिल्या दिवसापासूनच राष्ट्रीय पक्ष आहे. आपण केवळ आपल्या भौगोलिक स्थितीमुळेच नाही तर वैचारिक आधारामुळेही राष्ट्रीय पक्ष आहोत.

PM Modi
Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

मोदी म्हणाले की, आम्ही 400 बोललो होतो. आतापर्यंत 4 फेऱ्या पूर्ण झाल्या असून आमचा या ध्येयावरील आत्मविश्वास अधिक दृढ झाला आहे. भाजप हा शहरांचा पक्ष आहे आणि दक्षिण भारतात कमकुवत आहे, असा गैरसमज पसरवला जात आहे. असे अनेक नेरेटीव्ह समोर आले होते, जे आम्ही चुकीचे सिद्ध केले आहेत. ते म्हणाले की, देशात अशी एक इकोसिस्टम आहे, जी अशा अफवा पसरवते. असाच एक गैरसमज दलित वर्गाबाबत पसरवला गेला. सत्य हे आहे की बहुतांश दलित आणि आदिवासी खासदार आमच्या पक्षाचे आहेत.

PM Modi
RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()