तोडगा काढण्यासाठी 24 तासांची मुदत 

तोडगा काढण्यासाठी 24 तासांची मुदत 
Updated on

तिरुअनंतपुरम  - शबरीमाला मंदिरात सर्व महिलांना प्रवेश देण्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या अंमलबजावणीविरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी "लॉंग मार्च' काढला. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी भाजपने केरळ सरकारला 24 तासांची मुदत दिली आहे. त्यानंतर भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) त्यांचा लक्ष्य गाठण्यासाठी व्यापक आंदोलनासाठी मोहीम आखेल, असा इशारा भाजपचे प्रदेश अध्यक्ष पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी आज दिला. 
अय्यपा देवाची

छायाचित्र हातात घेऊन व भजन म्हणत शेकडो भाजप कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चात महिला व मुलांची संख्या लक्षणीय होती. हा मोर्चा येथील सचिवालयावर गेला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्याचा निर्णय राज्यातील सरकारने घेतला आहे. मात्र अयप्पा भक्तांच्या भावना लक्षात न घेता हा निर्णय सरकारने एकतर्फी घेतल्याचा आरोप करीत त्याच्या निषेधार्थ गेल्या आठवड्यात पंडलम येथून पायी मोर्चाला सुरवात झाली होता. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचा निर्णय म्हणजे हे तीर्थक्षेत्र नष्ट करण्याचे कारस्थान आहे, असा आरोपही भाजपने केला आहे. पिल्लई यांच्या अध्यक्षतेखाली आज मोर्चा काढण्यात आला. "एनडीए'चे वरिष्ठ नेते सुरेश गोपी, भारतीय धर्म जनसंघाचे प्रमुख तुषार वेल्लापल्ली हे या मोर्चाच्या अग्रस्थानी होते. 

देवस्वम मंडळाची आज बैठक 
दरम्यान, त्रावणकोर देवस्वम मंडळाने मंदिरातील मुख्य पुजाऱ्याचे कुटुंब, पंडालम राजघराणे आणि अय्यप्पा सेवा संगमाची बैठक मंगळवारी (ता. 16) बोलाविली आहे. यात वार्षिक मंडलम - मकराविलक्कु यात्रेच्या तयारीबाबत चर्चा होणार आहे. तीन महिने चालणाऱ्या या यात्रेला 17 नोव्हेंबरला प्रारंभ होणार आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरही चर्चा होण्याची शक्‍यता आहे. मल्याळी महिना "थुलम'मध्ये पाच दिवस चालणाऱ्या मासिक पूजा उत्सवासाठी शबरीमला मंदिर बुधवारपासून (ता. 17) सायंकाळी खुले होणार आहे. सोमवारी (ता.22) ते पुन्हा बंद होईल. 

हा प्रश्‍न लवकरात लवकर सोडविण्यात राज्य सरकारला अपयश आले, तर भाजपप्रणित "एनडीए' आघाडीच्या आंदोलनाला नवे वळण मिळेल. केरळमधील प्रत्येक ग्रामस्थांची भेट घेऊन प्राचीन काळापासून चालत आलेल्या शबरीमला मंदिराच्या परंपरेच्या जतनासाठी व अय्यप्पा भक्तांच्या भावना लक्षात घेऊन व्यापक आंदोलनाची मोहीम आखू. 
पी. एस. श्रीधरन पिल्लई,  भाजपचे केरळ प्रदेश अध्यक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()