नवी दिल्ली : नूपुर शर्माने (Nupur Sharma) पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्याने चांगलाच गदारोळ निर्माण झाला. यामुळे भाजप सावध झाली आहे. टीव्ही डिबेट्समध्ये जाणाऱ्या नेत्यांसाठी आणि प्रवक्त्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. चर्चेला उपस्थित राहताना त्याचे पालन करावे लागणार आहे. तसे न केल्यास पक्षशिस्तीचे उल्लंघन मानले जाईल. भाजपच्या सूत्रांनी या मार्गदर्शक तत्त्वांची माहिती दिली आहे. (BJP warns of Nupur Sharma case Guidelines set for spokespersons)
भाजपने (BJP) पक्षाच्या प्रवक्त्यांना (spokespersons) चर्चेदरम्यान कोणताही धर्म, त्यांची चिन्हे आणि प्रतिष्ठित व्यक्तींबद्दल आक्षेपार्ह काहीही बोलू नये. चर्चेदरम्यान सीमा ओलांडणे टाळावे. कोणत्याही प्रकारची चिथावणी देऊन पक्षाच्या विचारसरणीचे आणि आदर्शांचे उल्लंघन करू नये, असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे. प्रवक्त्यांना टीव्हीवर जाण्यापूर्वी पूर्ण तयारी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
चर्चेदरम्यान कोणत्याही वादात पडायचे नाही. विकासाच्या मुद्द्यावरच बोला. भाजपने प्रवक्त्यांना चर्चेदरम्यान केवळ सामाजिक कल्याण आणि विकासाच्या मुद्द्यांवर बोलावे. सरकारच्या कामगिरीची जास्तीत जास्त माहिती द्यावी. भाजपने आठ कलमी मार्गदर्शक तत्त्वे तयार केल्याचे बोलले जात आहे.
पंतप्रधानांनी आधीच दिला होता सल्ला
नेत्यांनी भाषणावर नियंत्रण ठेवावे. विकासाच्या मुद्द्यांवर आपल्याला चिकटून राहायचे आहे. लोक तुमची दिशाभूल करून अडकवण्याचा प्रयत्न करतील. परंतु, तुम्हाला तसे करण्याची गरज नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे महिन्यात जयपूर येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी परिषदेला संबोधित करताना सांगितले होते.
नूपुर शर्मा यांच्या वक्तव्याने चांगलाच वाद
नूपुर शर्मा (Nupur Sharma) यांनी २६ मे रोजी एक टिप्पणी केली होती. ज्यावरून वाद निर्माण झाला होता. सौदी अरेबिया, कतार, ओमान, बहरीन आणि यूएईसह सुमारे १५ मुस्लिम देशांनी या मुद्द्यावर आक्षेप घेतला आहे. एवढेच नाही तर या आक्षेपानंतरच भाजपने नूपुर शर्मा यांना निलंबित केले आहे. परराष्ट्र मंत्रालयानेही आपल्या निवेदनात नूपुर शर्मा यांच्या वक्तव्यावरून अरब देशांसमोर स्पष्टीकरण दिले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.