नवी दिल्ली- पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांता मुजूमदार यांनी स्वामी विवेकानंद यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. तृणमूल काँग्रेस या मुद्द्यावरुन आक्रमक झाली आहे. असे असले तरी मुजूमदार यांनी त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. (BJP West Bengal president Sukanta Majumdar insult swami vivekanand on football and Gita said tmc)
मुजूमदार यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात ते म्हणताना दिसताहेत की, बंगाल हे भक्ती चळवळीचे उगमस्थान राहिले आहे. बंगालमध्ये सनातन धर्म गेल्या कित्येक वर्षांपासून आहे. पण, काही काळ डाव्या लोकांमुळे बंगाल भटकला होता. जे लोक गीता वाचण्यापेक्षा फुटबॉल खेळाला उच्च स्थान देतात ते सर्व डाव्या विचारसरणीचे प्रोडक्ट आहेत. पण, बंगाल आता योग्य मार्गावर येईल.
मुजूमदार म्हणाले की, तृणमूल काँग्रेसकडून माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. आताच्या टीएमसी आणि डाव्या नेत्यांनी आम्हाला स्वामी विवेकानंदांच्या विचारांबाबत सांगू नये. मी स्वामी विवेकानंदांबद्दल बोललेलो नाही. मी तसं कसं करु शकतो? माझा व्हिडिओ नीट ऐकला तर कळेल की मी आताच्या डाव्या नेत्यांबाबत बोलत होतो. पण, तृणमूल लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे.
तृणमूल काँग्रेसचे नेते आणि मंत्री शसी पंजा यांनी आरोप केलाय की, मुजूमदार यांनी स्वामी विवेकानंद यांचा अपमान केला आहे. स्वामी विवेकानंद म्हणाले होते की, गीतेचा अभ्यास करण्यापेक्षा तुम्ही फुटबॉल खेळला तर तुम्ही अधिक स्वर्गाच्या जवळ जाऊ शकतात. दरम्यान, तृणमूल काँग्रेसने अनेक ठिकाणी निदर्शने करत मुजूमदार यांचा निषेध केला आहे. या मुद्द्यावरुन तृणमूल आक्रमक होऊ पाहत आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.