BJP in Rajya Sabha: लोकसभेत पिछेहाट झालेल्या भाजपची राज्यसभेत होणार सरशी; काय आहे फुलप्रूफ प्लॅन?

BJP in Rajya Sabha: राज्यसभेचे सदस्य असलेले सदस्य लोकसभा निवडणूकीत निवडून गेल्यानंतर 10 जागा रिक्त झाल्या आहेत.
Rajya Sabha
Rajya Sabha
Updated on

नवी दिल्ली- लोकसभा निवडणूकीत पिछेहाट झालेल्या भाजपची राज्यसभा निवडणुकीत सरशी होणार आहे. राज्यसभेचे सदस्य असलेले सदस्य लोकसभा निवडणूकीत निवडून गेल्यानंतर 10 जागा रिक्त झाल्या आहेत. या 10 जागेवर NDA ची सरशी होण्याची शक्यता आहे. कारण ज्या राज्यात राज्यसभेची निवडणूक होणार आहे, त्या राज्यात एनडीएचं सरकार आहे.

रिक्त झालेल्या 10 जागांपैकी 7 जागा या भाजपच्या आहेत, तर दोन जागा काँग्रेसची आणि 1 जागा RJD ची आहे. या जागांमध्ये महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेले पियुष गोयल आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नावाचा समावेश आहे. महाराष्ट्रात एनडीएचं बहुमत असल्यानं या दोनही जागेवर एनडीएचे उमेदवार निवडून येणार आहेत.

Rajya Sabha
Share Market : लोकसभा निवडणुकीचा धुरळा शांत झाला; राजकारण संपलं, अर्थकारण उरलं..

काँग्रेसला या निवडणुकीत के सी वेणूगोपाल आणि दिपेंद्र हुड्डा यांच्या दोन जागा गमवाव्या लागणार आहेत. केसी वेणुगोपाल हे राजस्थानहून राज्यसभेवर निवडून गेले आहेत, तर दिपेंद्र हुड्डा हरियाणातून राज्यसभेवर निवडून गेले आहेत. हरियाणा आणि राजस्थानमध्ये भाजपचं सरकार आहे. मात्र, हरियाणाचं सरकार सध्या अपक्षाच्या पाठिंब्याने सत्तेत आहे. दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टीने भाजप सरकारचा पाठींबा काढून घेतल्यानं भाजपसाठी ही जागा कठीण होण्याची शक्यता आहे.

Rajya Sabha
Maratha Reservation : ''लोकसभा निकालात जरांगेंचा इम्पॅक्ट नाही'', ओबीसींसाठी उपोषणाला बसलेल्या हाकेंचा हल्लाबोल

त्यामुळं राज्यसभा निवडणूकीत NDA ला 10 पैकी 8 ते 9 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. दरम्यान, राज्यातील एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या सुनेत्रा पवार या बिनविरोध निवडून गेल्या आहेत. शुक्रवारी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. यावेळी इतर कोणीही अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे सुनेत्रा पवार यांचा मार्ग मोकळा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.