भाजप व्यंकय्या नायडूंना राष्ट्रपतीपदाचा उमेदवार बनवणार?

BJP will field Venkaiah Naidu as its presidential candidate
BJP will field Venkaiah Naidu as its presidential candidateBJP will field Venkaiah Naidu as its presidential candidate
Updated on

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री व अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मंगळवारी (ता. २१) उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांची भेट घेतली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज होणाऱ्या भाजपच्या महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वी ही बैठक झाली. अशा स्थितीत एम व्यंकय्या नायडू हे सत्ताधारी पक्षाकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील की नाही, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. (BJP will field Venkaiah Naidu as its presidential candidate)

राजनाथ सिंह (Rajnath Singh) आणि जेपी नड्डा यांच्यावर पक्षाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर (Presidential election) विरोधकांसह विविध पक्षांशी चर्चा करण्याची जबाबदारी सोपवल्याची माहिती आहे. आज भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक होत असल्याने नायडूंसोबत शाह, सिंह आणि नड्डा यांच्या भेटीला महत्त्व आहे. बैठकीत एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर विचारमंथन होणार आहे. बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहू शकतात.

BJP will field Venkaiah Naidu as its presidential candidate
हिंसक जमावाने योग सत्राला केले लक्ष्य; फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या

नड्डा आणि सिंह हे दोघेही राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर अद्याप एकमत झालेले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी, जनता दल (संयुक्त) प्रमुख नितीश कुमार, बिजू जनता दल (बीजेडी) प्रमुख नवीन पटनायक आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांच्याशी दोघांनी चर्चा केली आहे.

...तर विजय निश्चित

भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत संख्येच्या आधारावर मजबूत स्थितीत आहे. त्यांना बिजू जनता दल किंवा आंध्र प्रदेशातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेस सारख्या पक्षांचा पाठिंबा मिळाला तर त्यांचा विजय निश्चित होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.