BJP Strategy : भाजपसाठी 2022 ठरलं सर्वोत्कृष्ट; आता 2023 मध्ये पक्षाला 'या' 10 आव्हानांना सामोरं जावं लागणार!

निवडणुकीतील यशाचा विचार केला तर 2022 हे वर्ष भाजपसाठी (BJP) खूपच चांगलं होतं.
Assembly Election LokSabha Election BJP
Assembly Election LokSabha Election BJPesakal
Updated on
Summary

निवडणुकीतील यशाचा विचार केला तर 2022 हे वर्ष भाजपसाठी (BJP) खूपच चांगलं होतं.

नवी दिल्ली : निवडणुकीतील यशाचा विचार केला तर 2022 हे वर्ष भाजपसाठी (BJP) खूपच चांगलं होतं. पक्षाचा सर्वात मजबूत बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये पक्षानं विक्रमी विजय मिळवला, तर भाजपनं उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये पुन्हा प्रचंड बहुमतानं सरकार स्थापन करून नवा राजकीय विक्रम रचला.

गोव्यातही भाजपला पुन्हा सरकार स्थापन करण्यात यश आलं. आता 2023 हे वर्ष भाजपसाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. कारण, या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका (Assembly Election 2024) लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणनीती ठरवणार आहेत.

यंदा भाजप गांधी कुटुंब आणि काँग्रेसला धक्का देणार

2023 मध्ये राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, त्रिपुरा, मेघालय, नागालँड, मिझोरम आणि जम्मू-काश्मीरसह एकूण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. सध्या राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. काँग्रेसमुक्त भारताचा नारा देणारा भाजप या दोन्ही राज्यांत काँग्रेसला सत्तेतून हटवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत आणि छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांचा पराभव करून भाजपला गांधी कुटुंब आणि काँग्रेस (Congress) दोघांनाही धक्का द्यायचा आहे. कारण, हे दोन्ही नेते गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे मानले जातात.

Assembly Election LokSabha Election BJP
Narendra Modi : PM मोदींच्या वडिलांचं निधन झालं, तेव्हाही ते..; VHP नेत्यानं करुन दिली 'ती' आठवण

कर्नाटकात पुन्हा सरकार स्थापन करण्यास भाजप सज्ज

याच वर्षी कर्नाटक आणि मध्य प्रदेशातही विधानसभा निवडणुका होणार आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये सध्या भाजपची सत्ता असून आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसशी त्यांची थेट लढत होणार आहे. मध्य प्रदेशातील आपल्या बालेकिल्ल्यातील सत्ता कायम राखण्याचं आणि दक्षिण भारतातील एकमेव राज्य असलेल्या कर्नाटकात पुन्हा सरकार स्थापन करण्याचं आव्हान भाजपसमोर असणार आहे. या दोन्ही राज्यांसाठी भाजपनं आतापासूनच तयारी सुरू केलीये.

Assembly Election LokSabha Election BJP
Amit Shah : भारताच्या एक इंचही जमिनीवर कब्जा करण्याचं धाडस कोणाच्यात नाही; अमित शाहांचा थेट चीनला इशारा

भाजपसाठी जम्मूची निवडणूक महत्त्वाची ठरणार

जम्मू-काश्मीरमध्ये यंदा विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. भाजपसाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. जम्मूमध्ये भाजप आधीच मजबूत स्थितीत आहे. परंतु, यावेळी पक्ष काश्मीर खोऱ्यातही मजबूत उपस्थिती नोंदवण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे. या वर्षी त्रिपुरा, मेघालय, नागालँड आणि मिझोराममध्येही विधानसभा निवडणुका प्रस्तावित आहेत. त्रिपुरामध्ये सध्या भाजपचं सरकार आहे.

Assembly Election LokSabha Election BJP
Car Accident : विजापूर-अथणी महामार्गावर माजी आमदाराच्या कारला अपघात; तिघे जखमी

जेपी नड्डांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढणार?

दरम्यान, वर्षाच्या सुरुवातीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपर्यंत वाढवला जाण्याची शक्यता आहे. भाजप हायकमांड 2023 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीचा आढावा घेण्याची शक्यता आहे. या बैठकांची कमान प्रामुख्यानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि भाजपचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बीएल संतोष यांच्याकडं असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.