जात जनगणनेवरून भाजपचा 'सस्पेन्स' संपुष्टात, सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहणार

Nitish Kumar
Nitish Kumaresakal
Updated on
Summary

जात जनगणनेवरून भाजपला सत्ताधारी आघाडीतील भागीदार, तसेच विरोधकांकडून टीकेला सामोरं जावं लागतंय.

जात जनगणनेवरून भाजपला (BJP) सत्ताधारी आघाडीतील भागीदार, तसेच विरोधकांकडून टीकेला सामोरं जावं लागतंय. अशा परिस्थितीत बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या नेतृत्वाखाली 1 जून रोजी होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीत भाजप सहभागी होणार असल्याचं पक्षाचं म्हणणं आहे. या बैठकीत राज्यस्तरीय जात जनगणना करण्याच्या पद्धतींवर चर्चा होणार आहे.

जात जनगणना (Caste Census in India) करण्याच्या मुद्द्यावरून एनडीएमध्ये (NDA) मतभेद निर्माण झाले आहेत. एनडीएचा मित्रपक्ष जेडीयू आणि एचएएमनं भाजप पक्षावर जात जनगणनेला विरोध असल्याचा आरोप केलाय. अशा स्थितीत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदारांना भाजप जात जनगणनेच्या विरोधात असल्याचा प्रचार करणं महागात पडलंय. या बैठकीला भाजप येणार की नाही, याबाबत सस्पेन्स होता.

Nitish Kumar
हृदयद्रावक! सेनेगल हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीत 11 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू

मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संजय जयस्वाल (Dr. Sanjay Jaiswal) यांनी बुधवारी संध्याकाळी भाजप या बैठकीत सहभागी होणार असल्याची पुष्टी केलीय. संजय जयस्वाल यांनी ट्विट करून म्हटलंय की, 'मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 1 जून रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षही सहभागी होणार आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात जात जनगणना करण्याच्या मुद्द्यावरून राजकीय गदारोळ सुरू आहे.

Nitish Kumar
Taj Mahal : 'ताजमहाल'च्या मशिदीत नमाज अदा करणाऱ्या 4 पर्यटकांना अटक

10 मे रोजी विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रीय जनता दल (RJD) नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी जात जनगणना न झाल्यास पाटणा ते दिल्ली पायी मोर्चा काढण्याची धमकी दिली होती. यानंतर तेजस्वी आणि नितीश कुमार यांनी 11 मे रोजी या विषयावर इन-कॅमेरा बैठक घेतली, त्यानंतर जात जनगणनेशी संबंधित सर्व मापदंडांवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.