नवी दिल्ली : भाजपनं नुकताच मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला. पण आता यावर द्रमुकच्या खासदारानं एक वादग्रस्त टिपण्णी केली आहे.
भाजप फक्त 'गौ मुत्र' राज्यांमध्येच निवडणुका जिंकतो आपण त्यांचा हिंदी हार्टलँड राज्ये असा उल्लेख करतो, असं विधान द्रमुकचे खासदार डीएनव्ही सेंथिलकुमार यांनी मंगळवारी केलं. त्यामुळं पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सनातन धर्मावर सडकून टीका केल्यानं यापूर्वी द्रमुक चर्चेत आला होता. (BJP wins only in Gomutra states new controversy emerged due to DMK MP Senthil Kumar)
काय म्हणाले सेंथिलकुमार?
जम्मू आणि काश्मीरशी संबंधित दोन विधेयकांवर लोकसभेत चर्चेत भाग घेताना DMK खासदार सेंथिलकुमार यांनी म्हटलं की, "या भाजपची शक्ती केवळ हिंदीच्या मध्यवर्ती राज्यांमध्येच आहे. तिथेच भाजपा निवडणुका जिंकत आहे. या राज्यांना आपण 'गौ मुत्र' राज्य म्हणतो" यावेळी त्यांनी भाजपच्या तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दक्षिणेकडील राज्यांमध्ये अपयशावर प्रकाश टाकला. (Latest Marathi News)
तसेच ते पुढे म्हणाले, "तुमच्याकडे ही सर्व राज्ये केंद्रशासित प्रदेशात बदलली तरी आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. कारण तुम्ही अप्रत्यक्ष सत्तेत येऊ शकत नाही. कारण तुम्ही तिथं पाऊल ठेवण्याचं आणि सर्व दक्षिणेकडील राज्यांचा ताबा घेण्याचं स्वप्न कधीही पाहू शकत नाही.
राहुल गांधी समर्थन करतात का?
सेंथिलकुमार यांच्या या टीकेवर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया आली आहे. भाजपनं यावरुन केवळ सेंथिलकुमार यांच्यावर टीकाच केली नाही तर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनाही टार्गेट केलं. याचं राहुल गांधी समर्थन करतात का? असा सवाल भाजपनं राहुल गांधींना केला आहे.
कर्नाटकचे माजी मंत्री आणि भाजप नेते सी टी रवी म्हणाले, "काँग्रेस नेते राहुल गांधी अशा अपमानास्पद वक्तव्याचे समर्थन करतात का? 'हार्टलँड' स्टेट्सच्या भारतीयांचा अपमान करणार्या द्रमुकच्या माणसाशी इंडिया आघाडीचे नेते असलेले राहुल गांधी सहमत आहेत का?" काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष किती काळ भारतीयांचा असा अपमान करणार आहेत, असं रवी यांनी म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)
भाजपनं केला निषेध
तामिळनाडचे भाजप प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी खासदार सेंथिलकुमार यांच्या विधानाचा निषेध केला तसेच त्यांच्या पक्षाच्या भाषणांची पातळी चेन्नईप्रमाणे 'बुडत' चालली असल्याचं त्यांनी म्हटलं. द्रमुकचे खासदार हे विसरले आहेत की पुद्दुचेरीमध्ये एनडीए आघाडी सत्तेवर आहे आणि अलीकडेपर्यंत कर्नाटकमध्ये सत्तेत होती. द्रमुकचा घमेंडीपणा हाच त्यांच्या पतनाचं प्रमुख कारण असेल, अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे.
यापूर्वीही केलं होतं हे विधान
दरम्यान, खासदार सेंथिलकुमार यांनी हिंदी भाषिक राज्यांना 'गौ मुत्र' राज्ये म्हणून संबोधण्याची ही पहिलीच वेळ नाही. सन 2022 मध्ये, देखील त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर बोलताना 'गौ मुत्र' राज्ये असा शब्दप्रयोग केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.