West Bengal: भाजपच्या महिला नेत्याला नग्न करून मारहाण? पश्चिम बंगालमध्ये नव्या वादाला सुरुवात

West Bengal new controversy: भाजपने दावा केलाय की, पीडित महिला ही पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाची उपाध्यक्ष आहे. भाजपने यासंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला पत्र देखील लिहिलं आहे.
west bengal crime
west bengal crime
Updated on

नवी दिल्ली- पश्चिम बंगालमधील कूच बिहार येथील एका ३२ वर्षीय महिलेला कपडे काढून मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वादाला सुरुवात झाली आहे. भाजपने दावा केलाय की, पीडित महिला ही पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाची उपाध्यक्ष आहे. भाजपने यासंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला पत्र देखील लिहिलं आहे.

सदर मुद्द्यावरून भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जुंपली आहे. याप्रकरणी एक टीम पाठवून तपास करण्यात यावा अशी मागणी भाजपने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे पत्र लिहून केली आहे. दुसरीकडे, तृणमूलने भाजपवर राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न होत आहे. पण, हे प्रकरण कौटुंबिक आहे.

west bengal crime
Tank Accident: लडाखमध्ये लष्कराच्या रणगाड्याचा अपघात, पाच जवान शहीद

पीडितेच्या वडिलांनी याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तक्रारीमध्ये म्हणण्यात आलंय की, कौटुंबिक वादातून त्यांच्या मुलीवर हल्ला करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचे शेजाऱ्यांसोबत वाद सुरु आहेत. शेजाऱ्यांनी माझ्या मुलीला शिव्या देण्यास सुरू केले. त्यानंतर तिचे केस पकडून तिला फरफटत नेण्यात आलं आणि तिला नग्न करण्यात आलं. त्यानंतर तिला मारहाण, धमकी देऊन रस्त्यावर सोडण्यात आलं.

पीडितेच्या वडिलांनी तक्रारीमध्ये कोणत्याही राजकीय नेत्याचे किंवा पक्षाचे नाव घेतलेले नाही. पण, पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, भाजपची कार्यकर्ता असल्यामुळे त्यांच्या मुलीवर हल्ला झाला आहे. सदर प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.

west bengal crime
Bengaluru Wedding : बंगळुरूच्या या जोडप्याने केला असा विवाह की चक्क निसर्गाने दिला आशीर्वाद; Zero Waste Weddingचा व्हिडीओ व्हायरल

हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या पीडितेने सांगितलं की, टीएमसीच्या महिलांनी तिला नग्न केले आणि तिला पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तृणमूलमध्ये प्रवेश केला नाही तर आणखी त्रास दिला जाईल असं सांगण्यात आलं. बेशुद्ध झाल्यानंतर मला सोडून देण्यात आलं. ४ जून पासूनच मला टार्गेट केलं जातं होतं.

दरम्यान, पोलिसांनी सांगितलं की, याप्रकरणी तीन महिला आणि चार पोलिसांना अटक करण्यात आली आहे. फोटो घेतल्याप्रकरणी आणि व्हायरल केल्याप्रकरणी पीडितेच्या बाहुजीला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.